Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रेडिट कार्ड, एलपीजीच्या किंमतीपासून ते UPI पर्यंत… या 7 नियमांत आजपासून बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम!

1 नोव्हेंबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग नियम, क्रेडिट कार्ड, बँकिंग नियम आणि मनी ट्रान्सफर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी या नियमांवषियी समजून घ्या. नाहीतर तुमचे मोठं नुकसान होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2024 | 01:31 PM
क्रेडिट कार्ड, एलपीजीच्या किंमतीपासून ते UPI पर्यंत... या 7 नियमांत आजपासून बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम!

क्रेडिट कार्ड, एलपीजीच्या किंमतीपासून ते UPI पर्यंत... या 7 नियमांत आजपासून बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम!

Follow Us
Close
Follow Us:

1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून अनेक नियमांत बदल करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला त्या महिन्यासाठीचे नवे नियम जाहीर केले जातात. या नियमांमध्ये व्यवहारांच्या किंमतींमध्ये होणारी वाढ निश्चित केली जाते. प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्याचे नियम देखील जाहीर करण्यात आले आहेत. हे नियम रेल्वे तिकीट बुकिंग नियम, क्रेडिट कार्ड, बँकिंग नियम आणि मनी ट्रान्सफर नियमांशी संबंधित आहेत. आजपासून क्रेडिट कार्ड, एलपीजीच्या किंमतीपासून ते UPI पर्यंत अनेक नियमांत बदल करणयात आलाा आहे. या नियमांचा परिणाम सर्वासामान्यांवर होणार असून वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

हेदेखील वाचा- Mahim Constituency: माहीमची लढत बिनविरोध नाहीत; सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम

आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग नियम, क्रेडिट कार्ड, बँकिंग नियम आणि मनी ट्रान्सफर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. शिवाय रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड, बँकिंग नियम आणि मनी ट्रान्सफर इत्यादींच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी या नियमांवषियी संपूर्ण माहिती समजून घ्या. नाहीतर तुमचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

एलपीजी गॅसच्या दरात वाढ

आज 1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज 1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅसच्या दरात 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या दर आधीप्रमाणेच राहणार आहेत.

हेदेखील वाचा- अमित ठाकरे लागले प्रचाराला! बायकोसह दिल्या मतदारांच्या घरी भेटी

दिल्लीत सिलिंडरची किंमत 1740 रुपयांवरून 1802 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरच्या किंमतीत 1850.50 रुपयांवरून 1911.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1692.50 रुपयांऐवजी 1754 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत देखील सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 1903 रुपयांवरून 1964 रुपयांपर्यंत वाढली आहे.

एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीचे दर

सीएनजी-पीएनजीच्या किमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. तथापि, एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत विमान इंधनाच्या किमतीत घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये एटीएफची किंमत 93,480.22 रुपये प्रति किलोलीटरवरून 87,597.22 रुपये प्रति किलोलीटर झाली होती. मात्र, आता त्याच्या किमती वाढल्या आहेत आणि दिल्लीत त्याची किंमत 90,538.72 रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचली आहे.

क्रेडिट कार्डचे नियम बदलले

स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी SBI कार्डने 1 नोव्हेंबरपासून मोठ्या बदलांची अंमलबजावणी केली. हे नियम आणि बदल क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसशी संबंधित आहेत. 1 नोव्हेंबरपासून, असुरक्षित SBI क्रेडिट कार्डवर दरमहा 3.75 रुपये फायनान्स चार्जेस भरावे लागणार आहेत. याशिवाय वीज, पाणी, एलपीजी गॅस आणि इतर उपयुक्तता सेवांमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास 1 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

मनी ट्रान्सफर नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डोमेस्टिक मनी ट्रान्सफर नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फसवणुकीसाठी बँकिंग चॅनेलचा गैरवापर रोखणे या उद्देशाने हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

रेल्वे तिकीट बदल

भारतीय रेल्वेचा रेल्वे तिकीट आगाऊ आरक्षण कालावधी, ज्यामध्ये प्रवासाचा दिवस समाविष्ट नाही, 1 नोव्हेंबर 2024 पासून 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तिकीट खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करून प्रवाशांची सोय राखणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे.

UPI बाबत वाढलेली मर्यादा

UPI ​​Lite प्लॅटफॉर्ममध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. आता UPI Lite वापरकर्ते अधिक पेमेंट करू शकतील. आरबीआयनेही व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. याशिवाय आणखी एक बदल करण्यात आला आहे, ज्यामध्ये UPI Lite बॅलन्स एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असणार आहे. नवीन ऑटो टॉप-अप वैशिष्ट्यासह, पैसे पुन्हा UPI लाइटमध्ये जोडले जातील.

13 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम नाही

नोव्हेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक सुट्ट्या असतील. या बँक सुट्ट्यांमध्ये, तुम्ही बँकांच्या ऑनलाइन सेवांचा वापर करून तुमचे बँकिंग संबंधित काम आणि व्यवहार पूर्ण करू शकता. ही सेवा 24X7 कार्यरत राहते. मात्र बँकेत जाऊन तुम्ही कोणतेही व्यवहार पूर्ण करू शकत नाही.

 

Web Title: Rules are change from 1st november 2024 about lpg cylinder upi to credit card know about the all rules in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • lpg cylinder
  • Marathi News

संबंधित बातम्या

Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला
1

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज
2

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार
4

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.