नवी दिल्ली: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यावर भारताने आक्रमक भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये असलेले 9 दहशतवादी अड्डे भारताच्या सुरक्षा दलांनी उडवून लावले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अनेक ड्रोन आणि मिसाईल्स भारताच्या महत्वाच्या शहरांवर आणि सुरक्षा दलांच्या ठिकाणांवर केले. मात्र भारताने हे हल्ले परतवून लावले. एस – 400 या एअर डिफेंन्स सिस्टिमने पाकिस्तानचे हल्ले हवेतल्या हवेत परतवून लावले. आता रशियाने भारतासमोर एस-500 एअर डिफेंन्स सिस्टिमचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते आहे.
रशियाने भारताला एस-500 एअर डिफेंन्स सिस्टिमचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते आहे. एस-500 एअर डिफेंन्स सिस्टिम रशियाची जगातील सर्वात प्रगत शस्त्र प्रणाली आहे. ही सिटीम 600 किमी दूर असलेले ड्रोन, मिसाईल, हायपरसोनिक मिसाईल नष्ट करू शकते. ही सिस्टिम एस -400 पेक्षा अधिक प्रगत आहे. ही सिस्टिम अधिक वेगवान, अचूक आणि आधुनिक आहे.
🚨 BREAKING NEWS
Russia proposes joint production of S-500 air defense system to India again. pic.twitter.com/vWtsMHYwzq
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 12, 2025
भारत आणि रशिया हे दोन्ही देश जून मित्रहेत. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. भारताला एस-400 च्या करारात अनेक युनिट्स रशियाने दिली आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असताना रशियाने हा ठेवलेला प्रस्ताव अधिक चर्चेत आहे. दरम्यान यावर भारत सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
भारत पाकिस्तान सबंध ताणले गेले असताना रशियाने हा ठेवलेला प्रस्ताव महत्वाचा समजला जात आहे. अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नसली तरी देखील यावर सरकारने चर्चा सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.
तर आम्ही घरात घुसून मारणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आदमपूर एअरबेसवरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले.”
“कोणत्या प्रकारची अणुहल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. भारताची लक्ष्मण रेषा एकदम स्पष्ट आहे. पाकिस्तानने नागरी विमानांच्या मागून भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे हल्ले परतवून लावले. आता पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या पद्धतीने उत्तर देईल”, असे मोदी म्हणाले.