कर्नाटकातील घनदाट जंगलात आढळली रशियन महिला; दोन मुलींसह गुहेत अनेक वर्षे वास्तव्य
कर्नाटकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीथे माणसाचा कधी पायही लागला नाही अशा ठिकाणी एक रशियन महिला कित्येक वर्षांपासून आपल्या दोन मुलींसह राहात होती. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात रामतीर्थ डोंगरांच्या कड्यातील एका गुहेत ही महिला आढळून आली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे.
Ahmedabad Plane Crash: फ्युएल स्विच बंद असल्याने प्लेन थेट….; रिपोर्टमधून समोर आला धक्कादायक खुलासा
पोलिस गस्त घालत असताना त्यांना काही लहान पावलांचे ठसे जमिनीवर दिसले. त्या पावलांच्या माग काढत पोलीस निरीक्षक श्रीधर आणि त्यांचं पथक गुहेपर्यंत पोहोचलं.तिथे ४० वर्षीय नीना कुटीना नावाची रशियन नागरिक आपल्या मुलींसोबत राहात असल्याचं आढळून आलं.
नीना कुटीना हिने भारतात येताच आपलं नाव ‘मोहिनी’ असं ठेवलेलं होतं. तिच्या दोन मुली ६ वर्षांची प्रेमा आणि ४ वर्षांची आमा तिच्यासोबतच जंगलात राहत होत्या. २०१७ साली गोव्यातून भारतात आलेली नीना, नंतर गोकर्णला पोहोचली आणि तिथून तिने अध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने जंगलातील नैसर्गिक गुहेतच आपलं निवासस्थान बनवलं. या गुहेमध्येच तिने एक रुद्र मूर्ती स्थापन केली असून, पूजा, ध्यान आणि साधनेत आपला वेळ घालवत असल्याचं ती सांगते.
पोलिसांनी ओळख विचारल्यावर सुरुवातीला नीनाने बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या आणि स्थानिक साध्वी योगरत्ना सरस्वती यांच्या मध्यस्थीमुळे तिने माहिती देण्यास सुरुवात केली. नीनाने सांगितलं की तिचा पासपोर्ट आणि व्हिसा हरवला आहे. मात्र पोलिसांनी शोध घेतल्यावर तिचे कागदपत्रं गुहेच्या आसपासच सापडले. त्यानुसार २०१७ मध्येच तिचा व्हिसा संपलेला असून, ती मागील आठ वर्षांपासून भारतात बेकायदेशीररीत्या राहत असल्याचं निष्पन्न झालं.
अचानक इंजिन झालं बंद अन्…; प्राथमिक अहवालातील धक्कादायक सत्यावर Air India नी दिली प्रतिक्रिया
पोलिसांनी तिला सांगितलं की ती राहत असलेला परिसर भूस्खलन प्रवण आणि जंगली प्राण्यांचा धोका असलेला असल्याने, तिथे राहणं सुरक्षित नाही. बराच वेळ समजावल्यावर नीनाने शेवटी जंगल सोडण्यास मान्यता दिली. सध्या नीना आणि तिच्या मुलींना ‘शंकरा प्रसाद फाऊंडेशन’ या एनजीओच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
१४ जुलै रोजी तिला FRRO (Foreigners Regional Registration Office) कार्यालयात पाठवण्यात येणार असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला आणि तिच्या मुलींना रशियात पाठवण्यात येणार आहे. सध्या नीना आणि तिच्या दोन्ही मुली सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.