रशियन महिलेने गोकर्णजवळील गुहेत ७ वर्षे कशी काढली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर
कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोकर्णनजीक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोकर्णजवळील रामतीर्थ डोंगरमाथ्यावर असलेल्या एका दुर्गम आणि भूस्खलनप्रवण गुहेत एक रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसोबतत तब्बल सात वर्षं राहात होती. इतकी वर्षे ही महिला एकटी लहान मुलासंह कशी काढली याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ही माहिती ९ जुलै रोजी गोकर्ण पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त गस्तीदरम्यान उघड झाली. गस्तीच्या वेळी एका गूढ हालचालीची दखल घेत पोलिसांनी गुहेतकडे धाव घेतली आणि तेथील दृश्य पाहून आश्चर्यचकीत झाले. गुहेत ४० वर्षीय रशियन नागरिक नीना कुटीना आपल्या दोन मुली – सहा वर्षांची प्रेमा आणि चार वर्षांची एमा – यांच्यासह राहात असल्याचं दिसून आलं.
ज्या भागात गुहा आहे, तो परिसर अत्यंत धोकादायक असून, सतत भूस्खलनाचा धोका असतो, शिवाय साप, विंचू आणि इतर वन्य प्राण्यांचाही वावर असतो. अशा ठिकाणी दोन बालकांसह राहणं केवळ धाडसीच नव्हे, तर जीवघेणं ठरू शकतं. नीना कुटीनाने पोलिसांना सांगितलं की, ती अध्यात्मिक साधनेसाठी आणि एकांताच्या शोधात भारतात आली होती आणि ही गुफा तिला ध्यानासाठी योग्य वाटल्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
मात्र, पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने याबाबत तात्काळ गंभीर दखल घेतली. सुरुवातीला नीना कुटीना हिने स्वतःची ओळख आणि कोणतेही दस्तऐवज देण्यास नकार दिला. मात्र, नंतर गुफेतून तिचा पासपोर्ट आणि वीजा संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यावरून समजले की ती १७ एप्रिल २०१७ रोजी भारतात आली होती. २०१८ मध्ये एग्जिट परमिट मिळवून ती नेपाळला गेली, पण त्याच वर्षी ८ सप्टेंबरला पुन्हा भारतात परतली आणि त्यानंतर बेकायदेशीररीत्या येथे वास्तव्य करत होती.
नीना आणि तिच्या मुलींना सध्या कारवार येथील महिला स्वागत केंद्रात तात्पुरत्या संरक्षणात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी बंगळुरुस्थित परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाशी (FRRO) संपर्क साधला असून, त्यांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या कुटुंबाला बंगळुरु येथे हलवण्यात येणार असून, तिथे त्यांच्या कायदेशीर स्थितीचा अंतिम निर्णय होईल.
Ahmedabad Plane Crash: फ्युएल स्विच बंद असल्याने प्लेन थेट….; रिपोर्टमधून समोर आला धक्कादायक खुलासा
केवळ सुदैवानेच त्यांना जंगलात काही झालं नाही. रामतिर्थ येथील जंगलात अनेक हिस्त्र आणि विषारी प्राणी आहेत. त्यां झोपण्यासाठी प्लास्टिक वापरत असत तर केवळ न्युडल्स खाऊन त्यांची गुजराण सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे.