भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान (Chandrayaan 3) मोहीमेला अवघे काही तास उरले आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनटांनी हे चंद्रयान लँड होणार आहे. ही मोहीम सुरळीत पार पडावी यासाठी देशविदेशातून पुजा, अर्चना, होमहवन करण्यात येत आहे. अनेक जण सोशल मिडियावरुन इस्रोला शुभेच्छा देण्यात येत आहे. ओडिशातील प्रसिद्ध वाळु कलाकार सुदर्शन पटनाईक (Sand Artist Sudarshan Pattnaik) यांनही वाळू शिल्प साकारात अनोख्या शैलीत इस्रोचं अभिनंदन केलं आहे. ओडिशात समुद्र किनारी हे सुदंर वाळूशिल्प त्यांनी साकारलं आहे.
[read_also content=”चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, दक्षिण अफ्रिकेतून व्हर्चुअली बघणार लँडिंग https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-will-attend-chanadrayaan-3-landing-program-virtually-from-south-africa-448383.html”]
चांद्रयान-३ च्या चंद्रावर उतरल्याचं वाळूशिल्प त्यांनी बनवलं आहे. याचे फोटो त्याने सोशल मिडीयावर चित्र शेअर करत त्यांनी लिहिले, “सर्व शुभेच्छा #Chandrayaan3 माझ्या विद्यार्थ्यांनी #Chandrayaan3 वर ओडिशातील पुरी बीचवर जय हो @ISRO संदेशासह सँड आर्ट बनवले.”
ALL THE BEST ?? #Chandrayan3
My students created a sand art on #Chandrayaan 3 with the message “Jai Ho @isro , at Puri beach in Odisha. pic.twitter.com/SDbL8kpbEt— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) August 22, 2023
संपूर्ण देशाच लक्ष लागून असलेल्या इस्रोचं चांद्रयान आज संध्याकाळी 6:04 च्या सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. लँडर यशस्वी झाल्यास, या प्रदेशात अंतराळयानाने सॉफ्ट लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, “चांद्रयान लँडिंग दरम्यान पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोशी संपर्क साधतील.” भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-३ बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. लँडर लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास, या प्रदेशात अंतराळ यानाने सॉफ्ट लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी देदेशभरात प्रार्थना सुरू आहेत. कुठे हवन-पूजा सुरू आहे तर कुठे गंगा आरती करून करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरातून हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. काशीतील दशाश्वमेध घाटावर माँ गंगेची विशेष आरती करण्यात आली, तर लखनऊमध्ये मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी चांद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना केली. कुठे मंदिरात पूजा सुरू आहे तर कुठे हनुमान चालीसा वाचली जात आहे. चांद्रयान यशस्वी होण्यासाठी बाबा काशी विश्वनाथ यांचीही प्रार्थना केली जात आहे.