Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित आकर्षक सजावट

गणेश विसर्जनासाठी पर्यावरणस्नेही पद्धतींचा अवलंब करावा, शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे लवकरात लवकर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन होण्यासाठी कृत्रिम हौदाची व निर्मल्य कलश इत्यादी,सोय करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 30, 2025 | 08:53 AM
Satara News: ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित आकर्षक सजावट
Follow Us
Close
Follow Us:
  • शाडुमातीची इकोफ्रेंडली गणरायाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा
  • माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणपूरक सजावट
  • जलवायू बदल, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण याबाबत जागरूक करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न

 

Satara News: यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपुरक ठरावा यासाठी पालिकेने पुढाकार घेत पालिका कार्यालयातच शाडुमातीच्या श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन पर्यावरणाचा संदेश देत सर्वांनीच पर्यावरण जोपासून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सन २०११ साली पालिकेने नव्याने बांधलेल्या पालिकेच्या इमारतीमध्ये यंदा प्रथमच गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. पालिकेने यासाठी खास शाडुमातीची इकोफ्रेंडली गणरायाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आहे, याबरोबरच स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले असुन देखावा सादर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व वस्तु या नैसर्गिक आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पाच नैसर्गिक तत्त्वांचा सुंदर संगम साकारण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरसह पंजाब, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस; अनेक नद्यांना पूर; गावे बुडाली

सजावटीद्वारे वातावरणातील बदल का होतात, त्यामागील कारणे आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम याची दृश्यात्मक उदाहरणे आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहेत. नागरिकांना जलवायू बदल, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण याबाबत जागरूक करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.‌ तसेच, नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी “सेल्फी पॉईंट” तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यंदा प्रथमच नव्या इमारतीमध्ये श्री. गणेशाची स्थापना करण्यात आल्याने या गणेशोत्सवात सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभागी होत यंदाचा गणेशोत्सव अधिक आकर्षक बनवला आहे.

म्हसवड नगरपरिषदेने “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेचे संवर्धन हे आपले सामूहिक कर्तव्य असल्याचे नगरपरिषदेकडुन सांगितले जात आहे.

BWF World Championships : PV Sindhu चे स्वप्नभंग! क्वार्टरफायनलमध्ये इंडोनेशियाच्या कुसुमा

नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, प्लास्टिकचा वापर टाळावा, थर्माकोलच्या सजावटीऐवजी पर्यावरणपूरक सजावट करावी. गणेश विसर्जनासाठी पर्यावरणस्नेही पद्धतींचा अवलंब करावा, शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे लवकरात लवकर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन होण्यासाठी कृत्रिम हौदाची व निर्मल्य कलश इत्यादी,सोय करण्यात आली आहे. पीओपी मिश्रित मूर्तींकरिता स्वतंत्र टाक्या बसविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी नागरीकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे – मुख्याधिकारी डॉ सचिन माने – सध्या
माझी वसुंधरा अभियान ६.०, स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि LiFE मिशन अंतर्गत राबवले जात असून, नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत असुन यावर्षीच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन व्हावे, यासाठी म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या पारंपरिक ठिकाणी तसेच कृत्रिम हौद , तलाव आणि नदीपात्रांमध्ये स्वच्छता करून सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गणेश विसर्जनासाठी पालिका यंत्रणा सज्ज – सागर सरतापे, आरोग्य निरीक्षक –

म्हसवड शहरातील विविध भागांत १ दिवस, ५ दिवस, ७ दिवस व १० दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून, विसर्जनाच्या सर्व ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हसवड माणगांगा नदीपात्रात रबरी बोटीसह नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Satara news attractive decorations based on the five principles under my vasundhara mission 60

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:53 AM

Topics:  

संबंधित बातम्या

गणेशमूर्तीला सजीव करणारे डोळे रेखाटणे बनतंय एक आव्हान; मूर्तीचे रंगकाम जबाबदारी आणि जोखमीचे
1

गणेशमूर्तीला सजीव करणारे डोळे रेखाटणे बनतंय एक आव्हान; मूर्तीचे रंगकाम जबाबदारी आणि जोखमीचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.