पीव्ही सिंधु(फोटो-सोशल मीडिया)
BWF World Championships Quarterfinal : भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे स्वप्नभंग झाले आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून सिंधू बाहेर पडली आहे. महिला एकेरीच्या क्वार्टरफायनलमध्ये इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानीकडून पराभव पत्करावा लागला आहे. महिला एकेरीच्या क्वार्टरफायनलमधील अटीतटीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या वारदानीने बाजी मारली. वारदानीविरुद्ध सिंधूने पहिला गेम 21-14 असा गमावला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने चांगली कामगिरी करून गेम 21-13 असा जिंकला. सिंधूने निर्णायक गेममध्ये देखील दमदार कामगिरी केली, परंतु वारदानीने आपला खेळ उंचावला आणि सामना खिशात घातला.
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती भारतीय खेळाडू पीव्ही सिंधूने गुरुवारी येथे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू चीनची वांग झी यी चा 21-19, 21-15 असा पराभव करून बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. 2019 मध्ये बासेलमध्ये जागतिक अजिंक्यपद जिंकणारी 15 व्या क्रमांकाची सिंधूने प्री-क्वार्टरफायनल विजय मिळवण्यासाठी 48 मिनिटे वेळ घेतला.
हेही वाचा : India vs China : Hockey Asia cup मध्ये भारताची विजयी सलामी! हरमनप्रीत सिंगच्या हॅटट्रिकने भेदली चीनची भिंत
पाच वेळा जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्या राहिलेल्या पीव्ही सिंधूने काही आक्रमक फटक्यासह जोरदार सुरुवात केली आणि पहिला गेम २१-१९ असा जिंकला तर वांग तिच्या पुनरागमनात निष्क्रिय दिसून आली होती. भारतीय खेळाडू सिंधुने दुसऱ्या गेममध्ये देखील आपली कामगिरी उंचावत सामना जिंकला आणि चिनी खेळाडूविरुद्धचा तिचा विक्रम ३-२ असा विक्रम आपल्या नावे केला.
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली याहे. या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलरने इतिहास रचला आहे. २१ व्या शतकात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये ब्रेंडन टेलर हा सर्वात जास्त एकदिवसीय कारकिर्दीचा खेळाडू ठरला आहे. ब्रेंडन टेलर ४ वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. टेलरने सप्टेंबर २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने एकदिवसीय कारकिर्दीची २० एप्रिल २००४ रोजी बुलावायो येथे श्रीलंकेविरुद्ध खेळून केली होती. झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून २१ वर्षे आणि १३२ दिवस झाले असून इतिहास रचला आहे.
स्वप्नभंग झाले आहे.