Saurabh Rajput Meerut murder case accused Muskan demands government to provide lawyer
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमधील हत्याने संपूर्ण देशाला हादरवले. या प्रकरणातील आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांच्यावर मुस्कानचा पती सौरभ राजपूत याची हत्या केल्याचा आरोप आहे. आता मुस्कानने सरकारकडे मागण्या केल्या आहेत. मुस्कानचे कुटुंबिय तिच्यावर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे परिवाराकडून तिला वकील संबंधित देखील कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नाही. कुटुंबीय तिला मदत करू इच्छित नाही. त्यामुळे मुस्काने सरकारकडे मागणी केली आहे.
मेरठ हत्या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल हे सध्या जेलची हवा खात आहेत. दोघांनाही मेरठ जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे., दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले असून संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तुरुंग अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी या प्रकरणातील आरोपींबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मुस्कानने त्यांना भेटून तिचे कुटुंब तिचा खटला लढणार नाही असे सांगितले. म्हणूनच तिला सरकारने वकील उपलब्ध करून द्यावा अशी तिची इच्छा आहे, असे तुरुंग अधीक्षकांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आरोपी मुस्कान हिने वकील देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
पुढे तुरुंग अधीक्षक विरेशे राज शर्मा म्हणाले की, “ते यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करतील, कारण हा कैद्याचा हक्क आहे. दोघांनाही व्यसनावर मात करण्यासाठी औषधे दिली जात आहेत आणि त्यांच्यावर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू आहेत. याशिवाय, त्यांना योग आणि ध्यान सत्रांसाठी देखील पाठवले जात आहे. इतर कैदी त्याला त्याच्या केसबद्दल वारंवार विचारू नयेत यासाठी तुरुंगात प्रयत्न केले जात आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
मुस्कानचे वडील प्रमोद तिला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले, जिथे तिने तिचा गुन्हा कबूल केला. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या पालकांना टाळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा दबाव आला तेव्हा त्याने सत्य सांगितले. प्रमोद यांनी त्यांच्या मुलीला कडक शिक्षा देण्यात यावी असे सांगितले. ते म्हणाले की, “या प्रकरणात लवकर निर्णय झाला पाहिजे आणि मला माझ्या मुलीला मृत्युदंडापेक्षा कमी काहीही नको आहे. तिने खूप चुकीचे कृत्य केले आहे. माझ्या जावयाला न्याय मिळाला पाहिजे.” अशी मागणी आरोपी मुस्कानच्या वडिलांनी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. सौरभ रजपूत यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केली. मुस्कान रस्तोगी नामक महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 15 तुकडे करून एका ड्रममध्ये भरून वरून सिमेंट काँक्रिट ओतून बंद केलं होतं. एवढंच नाही तर पतीची हत्या केल्यानंतर पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. मात्र, आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक करण्यात आली आहे. दोघांनाही नशा करण्याची सवय असून ते तुरुंगात देखील नशा करण्याची मागणी करत आहेत.