Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor दरम्यान IAF ने पाकिस्तानला बनवले ‘मामू’, दिला चकवा; पूर्ण PAK एअरफोर्सची लागली ‘लंका’

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी लष्कराचे जनरल आणि दहशतवादी नेते दोघेही आतापर्यंत शांतपणे झोपू शकलेले नाहीत कारण ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. पाकिस्तानला चकवा

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 17, 2025 | 07:17 PM
भारताने कसा उडवला पाकिस्तानचा धुव्वा

भारताने कसा उडवला पाकिस्तानचा धुव्वा

Follow Us
Close
Follow Us:

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवादाविरुद्ध कडक संदेश दिला. पण केवळ भारतीय सशस्त्र दलांच्या अग्निशक्तीमुळे पाकिस्तानी सैन्यावर कधीही न भरणारा घाव बसला नाही. भारतीय हवाई दलाची एक जादूची युक्ती होती ज्यामुळे पाकिस्तान फसला.

खरंतर ही भारतीय सैन्याने केलेली सुनियोजित फसवणूक होती. पाकिस्तानला मूर्ख बनवत भारतीय आर्मीने पुन्हा एकदा आपण काय करू शकतो दाखवले. ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तानी हवाई दल उद्ध्वस्त झाले. कारण भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या १२ पैकी ११ हवाई तळांवर शत्रू देशाला आपली ताकद जाणवून दिली

पाकिस्तानला कसा दिला चकवा 

भारत पाकिस्तान युद्ध कसे आणले आटोक्यात

ANI च्या एका वृत्तानुसार, वरिष्ठ संरक्षण सूत्रांचा हवाला देऊन, भारतीय हवाई दलाने (आयएएफ) ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या चीनने पुरवलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेला फसवून पाडण्यासाठी लढाऊ विमानांऐवजी अनेक डमी जेट्सचा वापर केला. ज्यामुळे पाकिस्तानी सेनेला कोणतीच पुढची कल्पना येऊ शकली नाही 

एएनआयने वृत्त दिले आहे की पाकिस्तानी हवाई दलाने त्यांचे संपूर्ण एचक्यू-९ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम लाँचर्स आणि रडार वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहेत. काही नवीन आलेल्या प्रणाली नवीन ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय झाल्यानंतर त्या आढळून आल्या. पुढे काय झाले ते जाणून घेऊया

पाकिस्तानचे तुकडे निश्चित! BLA ने 14 सैनिकांना यमसदनी धाडले; Video मधले सत्य काय?

भारतीय सेनेची करामत 

९ आणि १० मे च्या मध्यरात्री, भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या १२ पैकी ११ प्रमुख हवाई तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू करण्यापूर्वी, भारतीय हवाई दलाने प्रथम खऱ्या लढाऊ विमानांची प्रतिकृती बनवणारे मानवरहित लक्ष्य विमान पाठवले. यानंतर, पाकिस्तानी रडारने येणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांना पाडण्यासाठी धावपळ सुरू केली. या गोंधळाच्या दरम्यान, पाकिस्तानने त्यांची चिनी हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 सक्रिय केली, ज्यामुळे भारतीय हवाई दलाला पाकिस्तानी हवाई दलाचे नेमके स्थान कळले आणि ते सर्व भारतीय क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आले

क्षेपणास्त्रांची शक्ती 

भारतीय क्षेपणास्त्रांची कमाल

यानंतर, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाच्या महत्त्वाच्या तळांवर म्हणजेच एअरबेसवर लांब पल्ल्याच्या घातक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, ज्यामध्ये ब्रह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्या हल्ल्यादरम्यान, सुमारे १५ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि स्कॅल्प, रॅम्पेज आणि क्रिस्टल मेझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या डझनभर हवाई पट्ट्या, हँगर आणि दळणवळण पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. अशाप्रकारे, पाकिस्तानातील सिंधमध्ये एका विमानाचे आणि अनेक लांब पल्ल्याच्या ड्रोनचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. संरक्षण सूत्रांच्या मते, शत्रूंचा नाश करणाऱ्या सक्रिय संघर्षात ब्राह्मोसचा वापर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.

पाकिस्तानी डिफेन्स सिस्टिम नेस्तनाबूत 

सूत्रांनी एएनआयला सांगितले की, पाकिस्तानी हवाई तळांवर झालेले हल्ले इतके तीव्र होते की पाकिस्तानी हवाई दलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ताबडतोब शरणागती पत्करली. यामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले आणि अमेरिकेसमोर युद्धबंदीची विनंती करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी, त्यांनी पुढील सर्व लष्करी कारवाई थांबवण्यासाठी भारताशी सामंजस्य करार करण्यासाठी DFMO शी त्वरीत चर्चा करण्याची विनंती केली. 

Operation Sindoor : भारताच्या हवाई हल्ल्यात AWACS चं मोठं नुकसान; अखेर ब्रह्मोसचा वापर झाल्याची पाकिस्तानची कबुली

ऑपरेशन सिंदूर

या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांचा ताफा प्रामुख्याने पश्चिम हवाई कमांड आणि दक्षिण पश्चिम हवाई कमांड क्षेत्रांमधून नियंत्रित केला जात होता. रशियन S-400,  MRSAM आणि आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र युनिट्स आणि इतर पारंपारिक हवाई संरक्षण प्रणालींच्या परिपूर्ण समन्वयामुळे पाकिस्तानी हवाई दलाचे जमिनीवरून हवेत हल्ले हाणून पाडण्यात आले.

Web Title: Secret action of iaf against pakistan air base how did india made pak army fool during operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • Operation Sindoor
  • Operation Sindoor news

संबंधित बातम्या

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण
1

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
2

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये Indian Air Force चे प्लेन क्रॅश; कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश
3

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये Indian Air Force चे प्लेन क्रॅश; कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
4

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.