(फोटो- @VOICE_0F_BAL0CH)
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे. भारताने अनेक निर्णय घेत पाकच्या नाड्या आवळल्या आहेत. मात्र आता पाकिस्तानची अडचण चांगलीच वाढली आहे. बलुच आर्मीने देखील पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने त्यांच्या स्वातंत्ऱ्यासाठी लढा अधिक तीव्र केला आहे. त्यातच आता बलुच आर्मीने एक मोठा दावा केला आहे.
भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केल्यावर बलुच आर्मीने देखील त्यांचा लढा तीव्र केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे कधीही तुकडे होण्याची शक्यता आहे. बलुच आर्मीने पाकिस्तान लष्करावरील हल्ले तीव्र केले आहेत. येत्या काळात हे हल्ले अधिक मोठे होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या 14 ते 15 सैनिकांना ठार मारल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.
पाकिस्तानच्या सैनिकांना ठार मारल्याची जबाबदारी बलुच आर्मीने स्वीकारली आहे. बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सैन्य जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. पाक सैनिकांच्या वाहनाला बलुच आर्मीने लक्ष्य केले. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानवर धडाकेबाज हल्ले
बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या लढ्याला नवसंजीवनी देणारी एक मोठी घटना समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानविरोधात एकाच वेळी क्वेट्टा आणि मास्तुंग येथे मोठे हल्ले करून पाकिस्तान सरकारला थेट आव्हान दिले आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि त्यांचे सहकारी लक्ष्य करण्यात आले असून, या कारवायांना ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
14 Pakistan Army soldiers KILLED in a deadly ambush by Baloch Liberation Army (BLA) in Panjgur, Balochistan.
— Convoy DESTROYED, several INJURED.
— This ATTACK took place on 9th May.
— BLA just released the ATTACK video#BalochLiberationArmy #BalochistanIsNotPakistan pic.twitter.com/MHZfwmjlSS— VOICE OF BALOCHISTAN (@VOICE_0F_BAL0CH) May 15, 2025
क्वेट्टामध्ये पाकिस्तान सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित विजय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मुनीर मेंगल रोडवर ग्रेनेड हल्ला झाला. हा कार्यक्रम खासदार अली मदाद जट्टक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या संरक्षणाखाली होत होता. हल्ल्यामुळे एक एजंट ठार झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला फक्त एक सुरक्षा अपयश नव्हता, तर बलुच लढ्याचे प्रतीकात्मक बंड होते. बीएलएने स्पष्ट केले आहे की, “बलुचिस्तानवर पाकिस्तानचा कब्जा असलेल्या स्थितीत, असे राष्ट्रीय उत्सव हे आमच्यासाठी अपमानास्पद आहेत आणि ते सहन केले जाणार नाहीत.”
‘क्वेट्टा आणि मास्तुंग’ पेटले; बलुच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानवर धडाकेबाज हल्ले
या हल्ल्यांनंतर पाकिस्तान सरकारने तात्काळ प्रतिक्रिया दिली असून, क्वेट्टामध्ये कठोर सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. शहरात कंटेनर लावून नाकाबंदी करण्यात आली असून, अनेक भागांत संचारबंदीचा अंमल आहे. सरकारने या कारवाया दहशतवादी हल्ले म्हणून घोषित केले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सरकारची ही हालचाल परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनवत आहे.