भारताच्या हवाई हल्ल्यात AWACS चं मोठं नुकसान; अखेर ब्रह्मोसचा वापर झाल्याची पाकिस्तानच्या कबुली
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या महत्त्वाच्या AWACS (एअरबॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टम) चं मोठं नुकसान झालं आहे, अशी कबुली पाकिस्तानचे निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दहशतवाद्यांना ठेचणारचं! जम्मू-काश्मीरमध्ये इंडियन आर्मी ‘ऑन फायर’ मोडमध्ये; 6 जणांना दाखवले अस्मान
“भारतीय सैन्याने सलग चार ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपित केली. मात्र ती जमिनीवरून किंवा हवाई मार्गे आली हे स्पष्ट नाही,” असं मसूद अख्तर यांनी म्हटलं आहे. “आमचे वैमानिकांनी विमानाकडे धाव घेतली मात्र, पण क्षेपणास्त्र येतच राहिली. शेवटचे चौथे क्षेपणास्त्र थेट भोलारी हवाई तळावर असलेल्या हँगारवर आदळले. तिथे तैनात असलेल्या AWACS विमानचं नुकसान झालं आहे.”, असंही त्यांनी म्हटलं आहे.
BREAKING- Ex PAF chief admits that Pak has lost a PAF Awacs in Bholari strike
Biggest prized asset of PAF taken down in Op Sindoorpic.twitter.com/hTgV19F6aa
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) May 15, 2025
ही मुलाखत Frontal Force या संघर्ष निरीक्षण करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली होती. याआधी, भारताचे एअर मार्शल एके भारती यांनी देखील याची पुष्टी केली होती की, केवळ तीन तासांच्या आत पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. भारताने अचूक आणि मोजके हल्ले करून पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला जबरदस्त धक्का दिला आहे.
ऑपरेशन सिंदूर हे २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने चकलाला, रफिक, राहिम यार खान येथील लष्करी तळांवर हल्ले केले. त्यानंतर सरगोधा, भोलारी आणि जेकबाबाद येथेही लक्ष्य केले गेले. या कारवाईत रडार केंद्रे, कमांड सेंटर्स आणि शस्त्रसाठ्याच्या गोदामांवर हल्ले करण्यात आले.
पाकिस्तानच्या लष्कराकडून या हल्ल्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे महत्त्व कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र मसूद अख्तर यांची ही सामान्यजनांसमोर आलेली थेट कबुली आता त्या अधिकृत निवेदनाला छेद देणारी ठरत आहे. ही घटना दोन्ही देशांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली असून, भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहून स्पष्ट केले आहे की, आक्रमकता सहन केली जाणार नाही.