
जम्मू-कश्मीर: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय दहशतवाद्यांशी संबधिक शोधमोहीम सातत्याने सुरू आहे. यासाठी सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. अशातच आज (१७ मे) राज्य तपास यंत्रणेने (SIA)मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने (SIA) दहशतवादाशी संबंधित प्रकरणांशी संबंधित शोधमोहिमेदरम्यान, मध्य व उत्तर काश्मीरमधील सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगर येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा एजन्सीला संशयित दहशतवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. त्याच दरम्यान, सांबा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी हालचाली दिसून आल्यामुळे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने तेथे शोधमोहीम सुरू केली आहे.
Devendra Fadnavis: केंद्र सरकारचे शिष्टमंडळ हे प्रभावी डिप्लोमसीचे उदाहरण: देवेंद्र फडणवीस
जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने (SIA) काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादाशी संबंधित कारवाया रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. या संदर्भात शनिवारी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या, काश्मीरमधील ज्या भागात छापे टाकले जात आहेत त्यात सोपोर, बारामुल्ला, हंडवारा, गंदरबल यांचा समावेश आहे. याशिवाय श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते, हे छापे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित कारवायांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईचा एक भाग आहेत.
याशिवाय जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात तीन संशयित दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि निमलष्करी दलांच्या तुकड्या शोध मोहिमेत गुंतल्या आहेत. सकाळपासून ही शोध मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत, नांगल, चिल्ला डांगा, गोरान आणि आजूबाजूच्या जंगलांना वेढा घातला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री स्थानिकांना तीन संशयित आढळले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यापासून, या संशयितांचा शोध घेतला जात आहे.
भारतात परदेशी जाणाऱ्या ट्रेनही धावतात! जाणून घ्या कोणकोणत्या देशात रेल्वेने जाता येईल
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नूर खान एअरबेसवर भारताकडून झालेल्या हल्ल्याची कबुली दिली आहे. १० मे रोजी रात्री अडीच वाजता, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी त्यांना सुरक्षित दूरध्वनीवरून माहिती दिली की भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेससह इतर काही ठिकाणांना लक्ष्य केले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई दलाने स्वदेशी तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने देशाचे संरक्षण केले. यामध्ये चीनकडून प्राप्त झालेल्या लढाऊ विमानांचाही वापर करण्यात आल्याचेही शरीफ यांनी म्हटलं आहे.