भारतात रेल्वेचे मोठे जाळे पसरलेले आहे. दररोज अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात मात्र तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेचे जाळे फक्त देशापुरतेच मर्यादित राहिले नसून ते शेजारील देशांमध्येही पसरले आहे. भारतीय रेल्वे शेजारील देशांना रेल्वे सेवा पुरवते, ज्याला ज्याला आंतरराष्ट्रीय प्रवास म्हणतात. ही रेल्वे सेवा कोणकोणत्या देशात पुरवली जाते ते जाणून घेऊया.
भारतात परदेशी जाणाऱ्या ट्रेनही धावतात? जाणून घ्या कोणकोणत्या देशात रेल्वेने जाता येईल...
सध्या, भारतीय रेल्वे त्यांच्या शेजारील देश नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानसाठी गाड्या चालवते. तथापि, पाकिस्तानला जाणारी रेल्वे सेवा सध्या तात्पुरती बंद आहे. पण इतर दोन देशांमध्ये प्रवास नियमितपणे होत आहे
भारत आणि नेपाळमधील पहिली रेल्वे सेवा ०२ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाली, जी बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील जनकपूर आणि कुर्था पर्यंत धावते. हा रेल्वे मार्ग जयनगर-बिजलपुरा-बर्डीबास प्रकल्पाचा भाग आहे
ही ट्रेन जयनगरहून सकाळी ८:१५ आणि दुपारी २:४५ वाजता सुटते. जनकपूरला पोहोचण्यासाठी सुमारे १ तास २० मिनिटे लागतात, तर परतीच्या वेळी ही ट्रेन जनकपूरहून सकाळी ११:०५ आणि संध्याकाळी ५:३५ वाजता सुटते
भारत आणि बांगलादेश दरम्यान तीन प्रमुख रेल्वे सेवा सुरू आहेत. ज्यात मैत्री एक्सप्रेस (कोलकाता ते ढाका), बंधन एक्सप्रेस (कोलकाता ते खुलना), आणि मिताली एक्सप्रेस (जलपाईगुडी ते ढाका) यांचा समावेश आहे
भारत आणि पाकिस्तान दरम्यान दोन गाड्या धावत होत्या. यातील एकाचे नाव समझोता एक्सप्रेस (दिल्ली ते लाहोर) तर दुसऱ्याचे नाव थार एक्सप्रेस आहे (जोधपूर ते कराची). तथापि, ऑगस्ट २०१९ पासून या सेवा बंद करण्यात आल्या आहेत आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय तणावामुळे त्या पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत.