हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस
नागपूर: “जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी मी दर महिन्याला नागपूरमध्ये जनता भेटीचा कार्यक्रम घेतो,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या उपक्रमामुळं नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, “या कार्यक्रमात आलेल्या तक्रारी विभागांकडे पाठवून त्याचा नियमित फॉलो अप घेतला जातो. त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास अधिक दृढ झाला आहे. आपले प्रश्न येथे मांडल्यास ते नक्कीच सोडवले जातील, असा विश्वास लोकांना वाटतो आणि त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.”
मोठी बातमी! रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; केदारनाथमध्ये घडली दुर्दैवी घटना, पहा Video
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. या दौऱ्यामुळे खरे सत्य जगभर पोहोचेल. युद्धातील वास्तव जगासमोर मांडले जाईल आणि पाकिस्तान हा दहशतवाद समर्थक देश असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल. फडणवीस यांनी या शिष्टमंडळाच्या भूमिकेला “चांगली डिप्लोमसी” असे संबोधले असून, भारताच्या भूमिका जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असे मत व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप युती करणार की स्वबळावर लढणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच केलेल्या विधानानंतर भाजप महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याची अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपला साथ दिली, अशा मित्रपक्षांना सध्या ‘होल्डवर’ ठेवले जात असल्याचा संकेत मिळत आहे.
विशेषत: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वबळावर लढण्याचा सूर उमटू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने विधाने करणे सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निवडणुकीस ‘कामगारांची निवडणूक’ असे संबोधून, त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
दरम्यान, भाजप नेत्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गट शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पक्षांचे कार्यकर्ते भाजपवर ‘युती धर्म’ पाळण्याची मागणी करत असून, विश्वासघात झाल्यास सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे करून भाजपच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. युती टिकते की भाजप स्वतंत्र वाटचाल करतो, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.