Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुकमामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश! १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर होते २५ लाखांचे बक्षीस

केंद्र सरकारने नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेलया काही दिवसांत सुरक्षा दलाने शेकडो नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2025 | 05:08 PM
सुकमामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश! १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर होते २५ लाखांचे बक्षीस
Follow Us
Close
Follow Us:

सुकमा: केंद्र सरकारने नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेलया काही दिवसांत सुरक्षा दलाने शेकडो नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुकमा हा प्रदेश नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. मात्र याच सुकमा जिल्ह्यातून १६ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर समर्पण केले आहे.

ज्या १६ नक्षलवाद्यांनी समर्पण केले त्यामध्ये २ कुख्यात नक्षलवाद्यांचा समावेश आहे. १६ मधील ६ नक्षलवाद्यांवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याशिवाय एका महिला आणि पुरुष मावोवाद्यावर लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. १६ नक्षलवाद्यांमध्ये अनेक कुख्यात नक्षलवादी समाविष्ट आहेत. ज्यांचा अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता.

नियाद नेलला नार योजना आणि आत्म समर्पण नीती अंतर्गत या १६ नक्षलवाद्यांनी सरेंडर केले आहे. १६ नक्षलवाद्यांनी एसपी किरण चव्हाण, एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. अबुझहमदमध्ये सुरक्षा दलांनी वरिष्ठ नक्षलवादी कमांडरना घेरले आहे. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षकांनी (DRG) ही कारवाई केली. या कारवाईत आतापर्यंत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली भागामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली.

Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; अबुझहमदमध्ये 26 हून अधिक नक्षलवादी ठार

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, नक्षलग्रस्त नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाले.  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अबुझहमद भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

गोळीबारात एक जवान जखमी

नक्षलवादी पॉलिटब्युरो सदस्य आणि नक्षलवादी संघटनेचे सरचिटणीस बसव राजू हे अबुझहमाडच्या बोटेरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर १.५ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. तथापि, राजू चकमकीत मारला गेला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, गोळीबारात एक सैनिक जखमी झाला आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकड्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दलांनी ‘ब्लॅक फॉरेस्ट’ या नावाने नक्षलविरोधी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 214 नक्षलवादी लपण्याची ठिकाणं आणि बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

Web Title: Sisxteen naxalists surrender in sukma district front of police 25 lakh price money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • Indian Armed Forces
  • Naxalist

संबंधित बातम्या

१ नवरा, २ बायका… दोन्ही प्रेयसींसोबत तरुणाने बांधली लग्नगाठ, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडला विवाह
1

१ नवरा, २ बायका… दोन्ही प्रेयसींसोबत तरुणाने बांधली लग्नगाठ, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पार पडला विवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.