
Social media banned for children under 16 years of age in Andhra Pradesh
AP Social media ban : हैदराबाद : सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर तुफान वाढला आहे. सोशल मी़डियाचा लहान मुले देखील ही सर्रास वापर करत असल्यामुळे नको त्या गोष्टी लहान मुलांसमोर येत आहे. अनेकदा यामधून गुन्हेगारी प्रवृत्तीचा कंटेंट देखील पाहिला जात आहे. यावर आंध्र प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारप्रमाणे आंध्र प्रदेश सरकारने देखील लहान मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास मनाई केली आहे. आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भूमिका स्पष्ट केली आहे. नारा लोकेश म्हणाले की, आंध्र प्रदेश सरकार 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. ही बंदी ऑस्ट्रेलियामध्ये लावलेल्या बंदीप्रमाणे असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले
दावोस येथे ब्लूमबर्गशी झालेल्या भेटीमध्ये लोकेश यांनी राज्य सरकारचा मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयाचे फायदे सांगितले आहेत. ते म्हणाले की, विशिष्ट वयाखालील तरुणांनी अशा प्लॅटफॉर्मवर असू नये कारण त्यांना कोणत्या कंटेंटचा सामना करावा लागतो हे पूर्णपणे समजत नाही आणि या धोक्याला आळा घालण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट आवश्यक आहे, असे आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : माझा काका.. माझं बालपण…; दैनिक ‘सामना’तून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी
आंध्र प्रदेशच्या सरकारच्या या निर्णयावर टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते जी. दीपक रेड्डी म्हणाले की, लोकेश यांनी सोशल मीडियाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या परिणामांबद्दलची गंभीर चिंता योग्यरित्या अधोरेखित केली आहे. विशिष्ट वयाखालील मुले ऑनलाइन उपलब्ध असलेल्या हानिकारक सामग्रीला समजून घेण्याइतपत भावनिकदृष्ट्या प्रौढ नसतात. म्हणूनच आंध्र प्रदेश सरकार जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करत आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या १६ वर्षांखालील सोशल मीडिया कायद्याचे परीक्षण करत आहे.वायएसआर काँग्रेस पक्षाच्या (वायएसआरसीपी) राजवटीत, महिलांवर क्रूर आणि अपमानास्पद हल्ले करण्यासाठी सोशल मीडियाचा उघडपणे गैरवापर करण्यात आला. ऑनलाईन नकारात्मकेपासून लहान मुलांना थांबवणे असल्याचे रेड्डी म्हणाले आहेत.