SP leader Akhilesh Yadav Raction on Abu Azmi suspension
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. करोडो भाविकांनी आणि नागा साधूंनी संगमामध्ये स्नान केले आहे. लाखो भाविक दररोज कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत महत्त्वाची मागणी केली आहे. अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रयागराजमध्ये येणाऱ्या वाहनांबाबत मागणी केली आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रयागराजमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की यामुळे प्रवास आणि वाहतूक कोंडीच्या समस्या कमी होऊ शकतात. जर चित्रपटांना मनोरंजन करातून सूट देता येते, तर महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांना टोलमुक्त का करता येत नाही, असा टोला अखिलेश यांनी भाजप सरकारवर लगावला. महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांना टोलमुक्त केल्याने प्रवास सुरळीत होईल आणि भाविकांना त्रासापासून वाचवता येईल, असेही अखिलेश यादव म्हणाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून अखिलेश सतत यूपी सरकारवर हल्ला करत आहेत. अनेकदा त्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये गैरसोय असल्याची टीका केली आहे. तसेच सरकार मोठ्यापणाने गोष्टी सांगत असल्याची टीका देखील त्यांनी केली होती. महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादव उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. अखिलेश यांनी या अपघाताबाबत सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली आणि मृत आणि जखमींबद्दल योग्य आकडेवारी सादर करण्यास सरकारला सांगितले. महाकुंभातील मृत्यू, उपचार आणि इतर व्यवस्थेची आकडेवारी संसदेत सादर करावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली होती. अखिलेश यांनी सरकारच्या डेटा दडपण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, भाविक पुण्य मिळविण्यासाठी आले होते परंतु त्यांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह घेऊन परतावे लागले, असे अखिलेश यादव म्हणाले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर आता त्यांनी प्रयागराजमध्ये येणाऱ्या वाहनांना करमुक्त करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर देखील सपा नेते अखिलेश यादव यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रयागराजमध्ये येणाऱ्या वाहनांची व्हिडिओ पोस्ट केली आहे. यामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. हे सर्व वाहनं टोल देण्यासाठी रांगेमध्ये उभी आहेत. यामुळे महाकुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास हा टोलमुक्त करण्यात यावा अशी मागणी सपा नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.
महाकुंभ के अवसर पर उप्र में वाहनों को टोल मुक्त किया जाना चाहिए, इससे यात्रा की बाधा भी कम होगी और जाम का संकट भी। जब फ़िल्मों को मनोरंजन कर मुक्त किया जा सकता है तो महाकुंभ के महापर्व पर गाड़ियों को कर मुक्त क्यों नहीं? pic.twitter.com/1ceISd8WNK — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 9, 2025