Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Dalai Lama Press Release : तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचे नाव वादग्रस्त एपस्टीन फाइल्समध्ये आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन त्यांच्या धर्मशाळेने अधिकृत प्रेस रिलीज काढली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 01:22 PM
Spiritual leader Dalai Lama press release regarding name being mentioned in Epstein files

Spiritual leader Dalai Lama press release regarding name being mentioned in Epstein files

Follow Us
Close
Follow Us:
  • एपस्टीन फाइल्समध्ये तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचे नाव असल्याचा दावा
  • दलाई लामा यांच्या धर्मशाळेने काढले अधिकृत पत्र
  • एपस्टीनशी कधीही भेट न झाल्याचा दावा
Dalai Lama Press Release : हिमाचल प्रदेश : सध्या संपूर्ण जगामध्ये एपस्टीन फाइल्सने (Jeffrey Epstein) धुमाकूळ घातला आहे. लैगिंक अत्याचाराशी संबंधित या प्रकरणामध्ये ताकदवान नेते, सेलिब्रेटी आणि अनेक प्रसिद्ध लोकांची नावे समोर आली आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, शांतीचे प्रतीक मानले जाणारे तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचे नाव देखील या वादग्रस्त फाईल्समध्ये असल्याचा दावा केला जात आहे. यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्या नंतर हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील दलाई लामा (Dalai Lama) यांच्या कार्यालयाने आता अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे.

एपस्टीन फाइल्सने जागतिक राजकारण आणि ग्लॅमर जगतातील दिग्गजांची झोप उडवली आहे. अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या जेफ्री एपस्टाईनच्या गुप्त फायलींमध्ये अनेकांची नावं असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, दलाई लामा यांच्या कार्यालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर त्यांचे नाव कुख्यात लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईनशी जोडल्याच्या दाव्यांवर कडक शब्दांत इशारा दिला आहे. धर्मशाळेतून जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की परमपूज्य १४ वे दलाई लामा कधीही जेफ्री एपस्टाईन यांना भेटले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे धर्मशाळेकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

“कधीही भेटलो नाही, कधीही परवानगी दिली नाही” – धर्मशालाचे मोठे विधान

दलाई लामांनी त्यांच्या वतीने कोणालाही एपस्टाईनशी भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी कधीही दिली नाही याची पुष्टीही या निवेदनात करण्यात आली आहे. कार्यालयाने या अहवालांना “पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि निराधार” म्हटले आहे, ते दलाई लामांना चुकीचे चित्रित करण्याचा प्रयत्न आहे., असे देखील प्रेस रिलीजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

Press Statement Some recent media reports and social media posts concerning the “Epstein files” are attempting to link His Holiness the Dalai Lama with Jeffrey Epstein. We can unequivocally confirm that His Holiness has never met Jeffrey Epstein or authorised any meeting or… pic.twitter.com/QtV6B3Wr0u — Dalai Lama (@DalaiLama) February 8, 2026


या प्रेसमध्ये लिहिण्यात आले आहे. ‘एपस्टीन फाइल्स’ संबंधी काही अलीकडील माध्यमांतील अहवाल आणि सोशल मीडियावरील पोस्ट परमपूज्य दलाई लामा यांना जेफ्री एपस्टीन यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निःसंदिग्धपणे पुष्टी करतो की परमपूज्य दलाई लामा यांनी जेफ्री एपस्टीन यांची कधीही भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्या वतीने कोणालाही त्यांच्याशी भेटण्याची किंवा संवाद साधण्याची परवानगी दिलेली नाही, असे धर्मशाळेकडून सांगण्यात आले आहे.

हे देकील वाचा : ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध

जेफ्री एपस्टाईनमुळे कोणते सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात?

जेफ्री एपस्टाईन हा एक हाय-प्रोफाइल न्यू यॉर्कर होता, त्याच्यावर २००५ मध्ये पहिल्यांदा आरोप लावण्यात आला होता. २०१९ मध्ये, त्याला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली, परंतु कोठडीत असताना त्याने आत्महत्या केली. एपस्टाईन त्याच्या हाय-प्रोफाइल पार्ट्यांसाठी ओळखला जात असे, ज्यात जगातील सर्वात प्रभावशाली लोक उपस्थित राहत असत. एपस्टाईनच्या फायलींमधून अनेक प्रमुख व्यक्तींची नावे आणि फोटो उघड झाले आहेत, ज्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , बिल क्लिंटन आणि पॉप स्टार मायकल जॅक्सन यांचा समावेश आहे.

Web Title: Spiritual leader dalai lama press release regarding name being mentioned in epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Dalai Lama
  • Jeffrey Epstein

संबंधित बातम्या

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले
1

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले

Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट
2

Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?
3

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

Epstein Files मध्ये नाव आले अन्  ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश
4

Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.