Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: कागदपत्रे उधळली, सरन्यायाधीशांविरोधात अपशब्द…! सुप्रीम कोर्टात वकीलाचा पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

युक्तीवाद सुरू करतानाच त्याने न्यायाधिशांच्या खंडपीठाला उद्देशून, "न्यायिक सेवक महोदय, मी तुम्हाला लखनौचे एसीपी विकास नागर यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याचा आदेश देतो." अशी विधाने केली. 

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 10:37 PM
Prabal Pratap Lawyer Supreme Court

Prabal Pratap Lawyer Supreme Court

Follow Us
Follow Us:
  • देशातील सर्वोच्च न्यायपीठासमोर अशा प्रकारे थेट न्यायाधीशांवर कागदपत्रे फेकल्याचा प्रकार
  • कोर्टरूममधील या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला
  • कायदेशीर वर्तुळातून या वकिलाविरुद्ध न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) आणि कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी
 

Supreme Court Of India :  सर्वोच्च न्यायालयात आज (10जुलै)  भर सुनावणीत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.  कोर्टरूममध्ये एका प्रकरणाची सुनावणी  करत असताना एका वकिलाने  न्यायाधिशांवर कागदपत्रे फेकत अपशब्द वापरल्याने एकच गोंधळ उडाला. या सर्व घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या घटनेमुळे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथ आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. प्रबल प्रताप नावाच्या वकीलाने युक्तीवाद सुरू केला.  प्रबल प्रताप हे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर युक्तिवाद करत होते.  युक्तीवाद सुरू करतानाच त्याने न्यायाधिशांच्या खंडपीठाला उद्देशून, “न्यायिक सेवक महोदय, मी तुम्हाला लखनौचे एसीपी विकास नागर यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याचा आदेश देतो.” अशी विधाने केली.

Supreme Court News: बाल लैंगिक शोषणाची तक्रार दडपणे पडणार महाग! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

प्रबल प्रताप यांच्या या विधानांवर  न्यायमूर्ती विश्वनाथ यांनी , “तुम्ही आम्हाला आदेश देत आहात, असा सवाल केला. त्यावर बोलताना प्रबल प्रताप म्हणाले की, “मी सार्वभौैम आहे.” पण हा प्रकार इथेच थांबला नाही, प्रबल प्रताप यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे सरन्यायाधीशांसमोर उधळली. न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्याबाबतही अपशब्द वापरले. या सर्व प्रकारामुळे काही वेळासाठी  न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. आता  या सर्व प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

दरम्यान. सर्वोच्च न्यायालयाने  प्रबल प्रताप सिंग यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतरही खंडपीठाने कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले की,  खंडपीठाकडून प्रबल प्रताप यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्याचा विचार करत नाहीत. त्यांच्या याचिकेच्या गुणवत्तेबाबत, त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात काहीही तथ्य आढळले नाही आणि याचिका फेटाळण्यात येत आहे.   याचिकाकर्ता अत्यंत अस्वस्थ  आहेत,  ही त्याची निराशा आहे. त्यांना त्याच्याबद्दल सहानुभूती आहे.

Supreme Court on Ram Mandir Scam: राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

कोणत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा संपूर्ण वाद निर्माण झाला?

प्रबल प्रताप यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा वाद लखनौच्या विशेष मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या एका आदेशाशी संबंधित होता. याचिकाकर्त्याची इच्छा होती की, त्याच्या आरोपांच्या आधारे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले जावेत.   थेट एफआयआर नोंदवण्याचा आदेश देण्याऐवजी, न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज खाजगी तक्रार म्हणून हाताळला आणि पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका का फेटाळली?

प्रबल प्रताप यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिकाकर्त्याकडे प्रभावी पर्यायी कायदेशीर उपाय उपलब्ध असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले.

 

 

Web Title: Supreme court lawyer prabal pratap misbehaves throws papers at judges viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:37 PM

Topics:  

  • Supreme Court of India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.