Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nishu Azad Case: ‘CJP’चे संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; स्वतंत्र भारद्वाजविरोधात SC/ST ॲक्टनुसार गुन्हा दाखल 

Nishu Azad Case: आरोपींपैकी एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करत, संबंधित व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात आरोपींना अटक करून कठोर कलमांखाली कारवाई करावी, अशी मागणी CJPने केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 04, 2026 | 06:43 PM
Swatantra Bhardwaj Arrest, Nishu Azad Podcast Controversy, Cockroach Janata Party Protest,

Swatantra Bhardwaj Arrest, Nishu Azad Podcast Controversy, Cockroach Janata Party Protest,

Follow Us
Follow Us:
  • सीजेपी आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या दबावानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी स्वतंत्र भारद्वाज याला ७२ तासांत अटक करण्याचे आश्वासन
  • आरोपीवर अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार
  • पीडित संजय कुमार यांच्या पुनर्वैद्यकीय अहवालानंतर आरोपीवर कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) जोडण्याबाबत पोलीस निर्णय घेतील
Nishu Azad  Controversy: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी निशू आझादची तक्रार दाखल करत तिच्या वडीलांना मारहाण करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाज याला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्ली पोलिसांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर, निशू आझादने पुढे येऊन सांगितले की, पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले असून ७२ तासांच्या आत स्वतंत्र भारद्वाज यांना अटक केली जाईल. निशूने या आश्वासनावर विश्वास व्यक्त केला आणि आता न्यायाला आणखी विलंब होणार नाही अशी आशा व्यक्त केली.

नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज यांच्या एका व्हायरल पॉडकास्टमुळे (Viral Podcast) देशभरात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या’कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) एका आंदोलनादरम्यान निशू आझाद नावाच्या तरुणीच्या वडीलांना बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. स्वतंत्र भारद्वाज नावाच्या सोशल मिडिया इन्फ्ल्युएंजरने निशूचे वडील संजय कुमार यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत खुद्द निशूनेच या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ शेअर या प्रकाराची माहिती दिली.

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्याव

निशूने या प्रकाराबाबत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण भारद्वाज याच्यावर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्याला सोडून दिले. असे भारद्वाजने एका मुलाखतीत कबुली दिली. हा प्रकार लक्षात येताच निशूने पुन्हा एक व्हिडीओ पोस्ट करत थेट लोकसभा खासदार राहुल गांधी आणि कॉकरोच जनता पार्टीकडे आवाहन केले. या आवाहनानंतर आज सकाळीच कॉकरोच जनता पार्टीच्या शेकडो सदस्यांसह सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. स्वतंत्र भारद्वाज यांच्याविरोधात तातडीने प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्याची मागणी केली. सीजेपीच्या आंदोलनानंतर निशू आझाद हिने दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली.

दिल्लीत कॉकरोच जनता पक्षाने आयोजित केलेल्या २० जुलैच्या संसद मोर्चादरम्यान निशू आझादचे वडील संजय कुमार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेला स्वतंत्र भारद्वाज आता मोठ्या अडचणीत आला आहे. त्याच्या कबुलीजबाबाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर आरोपी स्वतंत्र भारद्वाजवर एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. याव्यतिरिक्त, दिल्ली पोलीस संजय कुमार यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करतील. या वैद्यकीय तपासणीतून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करायचा की नाही हे ठरवले जाईल. तसेच, आरोपीची अटक सुनिश्चित केली जाईल. असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

‘संजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत’

CJPचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान CJP कार्यकर्ती निशू आझाद आणि तिचे वडील संजय यांच्यासोबत मारहाण झाल्याचा आरोप केला. या घटनेत संजय यांच्या डोक्याला दुखापत झाली. दिल्ली पोलिसांकडे आम्ही सातत्याने आरोपींना अटक करण्याची आणि त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही,” असा आरोप रांका यांनी केला.

आरोपींपैकी एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करत, संबंधित व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात आरोपींना अटक करून कठोर कलमांखाली कारवाई करावी, अशी मागणी CJPने केली आहे.

‘पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप केला नाही’ – दिल्ली पोलिस

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी CJPचे आरोप फेटाळून लावले आहेत. 23 जून रोजी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित मारहाणप्रकरणाच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन्ही व्यक्तींविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, जंतर-मंतरवर झालेल्या झटापटीदरम्यान गाझियाबाद येथील 38 वर्षीय संजय कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या घटनेशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि आरोपींपैकी एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, CJPकडून आरोपीच्या अटकेची आणि कठोर कलमांखाली कारवाईची मागणी केली जात असताना, दिल्ली पोलिसांनी मात्र संबंधित दोन्ही आरोपींविरोधात कायद्यानुसार कारवाई झाल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Swatantra bhardwaj in trouble delhi police promises arrest in 72 hours after cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 06:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.