
Wing Commander Namansh Syal Wife and Daughter
Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी दुबई एअरशोमध्ये भारताच्या हवाई दलाच्या तेजस फायटर जेटचा भीषण अपघात झाला. या अपघातात तेजच पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना काल (२३ नोव्हेंबर) भारतीय हवाई दलाकडून अखरेचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी विंग कमांडर अफशान आणि त्यांची सात वर्षाच्या मुलीने देखील आपल्या वडिलांना अखरेचा निरोप दिला. आपल्या पतीचा मृतदेह पाहून विंग कमांजर अफशानना यांना देखील अश्रू अनावर झाले होते. त्यांनी आपल्या पतीला विंग कमांडर नमांश स्याल यांना सलाम केला आणि अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते. या हृदयद्रावक दृश्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल.
#WATCH | Himachal Pradesh: Wing Commander Afshan salutes her husband, Wing Commander Namansh Syal, as she pays her last respects to him. Wing Commander Namansh Syal lost his life in the LCA Tejas crash in Dubai on 21st November. pic.twitter.com/DPKwARut4r — ANI (@ANI) November 23, 2025
विंग कमांडर यांना सात वर्षाची एक मुलगी आहे. तिला देखील तिच्या वडिलांकडे घेऊन जाताना एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. चिमुकली अतिशय घाबरलेली, गोंधळलेली दिसत आहे. या दोन्ही घटनांचे हृदयद्रावक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर नमांश स्याल यांच्या जाण्याने संपूर्ण हिमाचल प्रदेश दुखात बुडाला आहे. त्यांचे पार्थीव घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांच्या अत्यंदर्शनासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.
Tejas pilot Wg Cdr Namansh Syal’s wife Wg Cdr Afshan (a serving officer) & daughter today ahead of his last rites. Nobody braver than the families of armed forces personnel. pic.twitter.com/CIo1YubVje — Shiv Aroor (@ShivAroor) November 23, 2025
शिवाय विंग कमांडर नमांश स्याल यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना घडली तेव्हा नमांश यांचे वडिल युट्यूबवर आपल्या मूलाच्या दुबई एअर शो मधील व्हिडिओ पाहत होते. त्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी म्हटले की, मी केवळ माझ्या मुलालाच गमावले नाही तर देशाने एक शूर सैनिकालाही गमावले आहे. सध्या नमांश स्याल यांच्या कुटुंबात दु:खाचे वातावरण आहे. अत्यंसंस्कारावेळी त्यांची पत्नी अफशान, मुलगी आणि आई उपस्थित होते. तसेच गावातील अनेक लोकांनी देखील आदराने त्यांना अखेरचा निरोप दिला.
चेहऱ्यावर हास्य अन् आत्मविश्वास; Tejas पायलट नमांश स्याल यांचा मृत्यूपूर्वीचा VIDEO आला समोर