Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’
भारताच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, तेजस लढाऊ विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवारी (२३ नोव्हेंबर) कमांडर नमांश स्याल यांचे पार्थीव कोइम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावर आणण्यात आले. यावळी त्यांचे सहकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारताच्या हवाई दलाने (IAF) लष्करी सन्मानाने विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच कोइम्बतूरचे जिल्ह्याअधिकारी पवन कुमार, पोलिस अधीक्षक कार्तिकेयन यांनी देखील जिल्हा प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहिली.
विंग कमांडर हे मूळचे हिमाचल प्रदेशातील रहिवासी होते. त्यांनी सुलुर तळावर वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केल आहे. नुकतेच त्यांच्यावर दुबईतील आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या सादरीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. स्याल यांनी दहा वर्षांहून अधिका काळ हवाई दलाच्या केवेत घालवला आहे. त्यांना एक शांत आणि शिस्त प्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. लहानपणीपासूनच त्यांना देशाची सेवा करण्याची इच्छा होती. २४ डिसेंबर २००९ मध्ये ते भारतीय हवाई दलात रुजू झाला होते.
The Indian Air Force deeply mourns the tragic loss of Wg Cdr Namansh Syal, who lost his life in the unfortunate Tejas aircraft accident at the Dubai Air Show.
A dedicated fighter pilot and thorough professional, he served the nation with unwavering commitment, exceptional skill… pic.twitter.com/1XytMiFWsG — Indian Air Force (@IAF_MCC) November 22, 2025
विंग कमांडर नमांश स्याल यांच्या पत्नी देखील एक हवाई दल अधिकारी होत्या. त्यांना एक सात वर्षाची मुलगी आहे. या अपघाताने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दु:खद मृत्यूने भारताच्या हवाई दलालाही मोठा धक्का बसला आहे. भारताच्या हवाई दलाने एक उत्कृष्ट लढाऊ सैनिकाला गमावला आहे. सध्या या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.






