Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk Father : एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांच्या दर्शनानंतर भावूक; वेदांबद्दल काय म्हणाले? एकदा ऐकाच

जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांनी बुधवारी दुपारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. या अनुभवाचं वर्णन त्यांनी अद्भुत आणि माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग अस

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 04, 2025 | 09:24 PM
एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांच्या दर्शनानंतर भावूक; वेदांबद्दल काय म्हणाले? एकदा ऐकाच

एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांच्या दर्शनानंतर भावूक; वेदांबद्दल काय म्हणाले? एकदा ऐकाच

Follow Us
Close
Follow Us:

जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांनी बुधवारी दुपारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. या अनुभवाचे वर्णन त्यांनी अद्भुत आणि माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग असं केलं आहे. राम मंदिराबरोबरच त्यांनी जवळील हनुमानगढी मंदिरालाही वंदन केले. एरोल मस्क आपल्या मुलगी अलेक्झांड्रा मस्कसोबत दुपारी सुमारे २.३० वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचले. सुमारे ४ वाजेपर्यंत त्यांनी राम मंदिरात दर्शन घेतलं. त्यांनी भारतीय पारंपरिक पोशाख म्हणजेच कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टाटा ग्रुपचा शेअर ६०० रुपयांपर्यंत घसरेल? ब्रोकरेजने दिले ‘SELL’ रेटिंग

यावेळी एरॉल मस्क म्हणाले, “ही भेट खरोखरच अद्भुत होती. मी अत्यंत आनंदी आहे की मी इथे आलो. जेव्हा संपूर्ण मंदिर पूर्ण होईल तेव्हा जगातील आश्चर्यांपैकी एक होईल, अशी मला खात्री आहे. भारतामधील माझा अनुभव अतिशय छान आहे. मी येथे सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्स लि. या कंपनीसोबत काम सुरू करण्यासाठी आलेलो आहे. भारतात बराच काळ घालवण्याची माझी इच्छा आहे. इथली मंदिरंही अद्वितीय आहेत आणि लोकही अत्यंत आपुलकीने वागतात”

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत आधीपासूनच त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये ड्रोनविरोधी अत्याधुनिक प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख, पर्यटकांची नियमित तपासणी आणि विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. एरॉल मस्क यांच्या भेटीसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही, कारण सध्याची सुरक्षा यंत्रणा पुरेशी आहे,” असंही एका पोलिस अधिकार्‍याने सांगितलं.

येस बँकेची मोठी घोषणा, १६,००० कोटी रुपये उभारण्यास मान्यता; शेअर्स वधारले

एरॉल मस्क हे हरियाणास्थित सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्स लि. चे ग्लोबल सल्लागार (Global Advisor) आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एरॉल यांचा भारत दौरा १ जून रोजी सुरू झाला असून, तो ६ जूनपर्यंत असणार आहे. त्यांच्या या भेटीचे मुख्य उद्दिष्ट भारतातील हरित तंत्रज्ञान (Green Technology) आणि विद्युत वाहन (EV) चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाला गती देणे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.या दौऱ्यात सर्वोटेकचे व्यवस्थापकीय संचालक रमन भाटिया हे देखील राम मंदिरास भेट देणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

१४ हजार वर्षांहूनही जुने

भारताचा इतिहास अविश्वसनीय आहे. जगाचा इतिहास कोणत्या ना कोणत्या मार्गे भारताशी जोडलेला आहे, असं मला वाटतं. वेद १४ हजार वर्षे जुने असल्याचं सांगितलं जातं, मात्र ते त्याही आधीचे आहेत. वेदांमध्ये विमानांचा उल्लेख आहे. हे सगळं खूप आकर्षक आणि अविश्वसनीय असं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Tesla ceo elon musk father errol visits ayodhya ram mandir with daughter alexandra latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • ayodhya
  • elon musk
  • ram mandir

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी
1

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात
2

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती
3

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती

मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?
4

मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.