खडगपूर : हावडा-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या (Superfast Express) लोको पायलटने खडगपूर रेल्वे विभागाच्या पंसकुरा स्टेशनवर रेल्वे सिग्नल (Railway Break Signal) तोडला. चक्रधरपूर लोको पायलट आरय खालको आणि सहाय्यक लोको पायलट ए. के. दास यांना सिग्नल तोडल्याबद्दल तत्काळ निलंबित करण्यात आले. ही घटना खरगपूर रेल्वे विभागातील पंसकुरा स्थानका दरम्यानची आहे.
पानस्कुरा स्थानकावर ट्रेन 5 मिनिटे थांबणार होती, पण लोको पायलटने ट्रेन थांबवली नाही आणि स्टेशनचा लाल सिग्नल तोडून 250 मीटर पुढे गेला. या घटनेची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि ट्रेनच्या चालकांना इंजिनमधून बाहेर काढण्यात आले. यादरम्यान रेल्वे पंचकुरा येथे तब्बल 4 तास उभी होती. माहिती मिळाल्यानंतर खरगपरच्या डीआरएमसह टीमने संयुक्त अहवाल तयार करून चालकांना निलंबित केले.
दोघेही चक्रधरपूर क्रू लॉबीचे
लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट हे चक्रधरपूर क्रू लॉबीचे आहेत. हावडाहून ही ट्रेन सुमारे एक तास उशिराने निघाली. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही. दरम्यान, ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क झाल्याचे दिसत आहे.
मालगाडी घसरली
जयपूर उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर विभागात एका मालगाडीचे दोन डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. ही घटना जयपूर विभागातील आसलपूर जोबरेन आणि हिरनोदा स्थानकादरम्यान घडली. या घटनेमुळे जयपूर मारवाड, मारवाड – जयपूर, जयपूर-जोधपूर, जोधपूर- जयूर, अजमेर – जयपूर, जयपूर- अजमेर, जयपूर- सूरतगड या गाड्या रद्द कराव्या लागल्या.