Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Kishor News: ..तर राजकारण सोडून देईन; बिहारच्या निवडणुकांबाबत प्रशांत किशोरांचा खळबळजनक दावा

बिहारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उलेमा आणि समाजातील प्रमुख चेहऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि विशेष टोप्या वाटण्यात आल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 03:16 PM
Prashant Kishor News: ..तर राजकारण सोडून देईन; बिहारच्या निवडणुकांबाबत प्रशांत किशोरांचा खळबळजनक दावा
Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधींची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहार दौरा
  • प्रशांत किशोरांचा राजकारण सोडण्याचा दावा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारचा दौरा केला. या दोघांच्याही बिहार दौऱ्यानंतर बिहारमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आरजेडी आणि भाजप, जेडीयू यांच्यातील संघर्ष वाढला आहे. तर दुसरीकडे जनसुराज पक्षाकडूनही विरोधकांवर सातत्याने टीकांचा वर्षाव होऊ लागला आहे. अशातच राजकीय रणनीतीकार आणि ‘जन सुराज’ चळवळीचे नेते प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. बिहारमधील किशनगंज येथे आयोजित बैठकीत त्यांनी जेडीयू व भाजप नेत्यांवर परखड शब्दांत हल्ला चढवला.

सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू

बिहारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उलेमा आणि समाजातील प्रमुख चेहऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि विशेष टोप्या वाटण्यात आल्या. व्यासपीठावरून भाषण करताना प्रशांत किशोर यांनी पैगंबर मोहम्मद साहेब आणि धर्माचा उल्लेख करून जनतेकडून पाठिंबा मागितला. सभेला उपस्थित असलेल्या लोकांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. पण तिथे गर्दीमुळे मोठा गोंधळही उडला होता. काही लोकांनी आरोप केला की त्यांना ५०० रुपये आणि जेवणाचे आश्वासन देऊन आणण्यात आले होते, परंतु ते वचन पूर्ण झाले नाही, ज्यामुळे ते संतप्त दिसले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, ‘जर आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे.

“रस्त्यावरच्या कुत्र्याशी तुलना” – वर्मांच्या आरोपांवर संताप

जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस मनीष वर्मा यांनी किशोर यांच्यावर दारू माफियांशी संगनमत असल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना, रस्त्यावर चालणाऱ्या कुत्र्याशी मी तुलना करत अशा लोकांना उत्तर देणे मला आवश्यक वाटत नाही,”   अशा खोचक शब्दांत टिकाही केली.

जयस्वालांच्या नोटिशीवर बोचरी प्रतिक्रिया

भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीवर उत्तर देताना किशोर म्हणाले, “जेव्हा कोल्हा मरणार असतो, तेव्हा तो शहराकडे धावतो. जयस्वालसारखे लोक नोटिशीव्दारे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी अशा १०० नेत्यांनाही घाबरणार नाही.”

IMD Rain Alert: कुठे दिलासा तर कुठे संकट! आज पाऊस ‘या’ राज्यांना धुवून काढणार, पहा IMD चा अलर्ट

जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्यास निवृत्तीचा पुनरुच्चार

प्रशांत किशोर म्हणाले की, “जर आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर मी राजकारणातून निवृत्त होईन.  पश्चिम बंगालमध्येही भाजपने त्यांना १०० जागा मिळतील असे भाकीत केले होते. पण ते फसले. तसेच जेडीयूचेही होईल.” असा दावा प्रशांत किशोरांनी केला.

मुस्लिम मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न?

दरम्यान काही लोकांनी सांगितले की,  सीमांचल भागात  मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न  करण्यात आला. त्यांच्याकडून टोप्या वाटण्यात आल्या, धार्मिक भाषणांतून  मतपेढीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्नही कऱण्यात आला. पण स्थानिकांनी त्यांच्या या फसवणुकीला बळी न पडण्याची भूमिका घेतली.  एकंदरीत किशनगंजमध्ये झालेली सभा प्रशांत किशोर यांच्या वकृत्वशैली, राजकीय टीका आणि निवडणूक रणनीतीमुळे चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली. त्यांच्या कार्यक्रमाबाबतही विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.एकूणच, बिहारच्या आगामी निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांची मोहीम अधिक आक्रमक होत चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Web Title: Then i will quit politics prashant kishors sensational claim regarding bihar elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Bihar Election 2025

संबंधित बातम्या

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक…
1

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक…

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?
2

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?

Bihar Election 2025 : देशभरात एकाच वेळी SIR लागू करणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3

Bihar Election 2025 : देशभरात एकाच वेळी SIR लागू करणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा
4

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.