अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
पर्वतीय राज्यांमध्ये पावसाचा कहर
आज देखील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
IMD Rain Alert: देशभरातील अनेक राज्यांना आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी, पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीये. देशभरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व अन्य राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पंजाब, दिल्ली या राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये आज देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पुढील दोन दिवस दिल्लीत पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. तर 11 आणि 12 तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा हाय अलर्ट
उत्तराखंड राज्यात गेले एक दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने डेहराडून, बागेश्वर व नैनीताल या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान 13 तारखेला हल्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र पूर्वेकडील राज्य, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबमध्ये अनेक भागात पुर आला आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरबाधित राज्यांचा दौरा करणार आहेत.
अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पुरामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूरग्रस्त राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात वेग येण्यास फायदा होणार आहे.