Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Price : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; एलपीजी सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला

1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण बजेट सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. आता लोकांना LPG गॅस सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2026 | 11:42 AM
LPG Price : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; एलपीजी सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला
Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
  • एलपीजी सिलेंडर महागला
  • आजपासून किंमतीत वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण बजेट सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. आता लोकांना LPG गॅस सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.

 

ही वाढ 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींत करण्यात आली आहे. बजेटच्या दिवसापासून सिलेंडर 49 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. दरम्यान, 14 किलोंच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांत, 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत सातत्यानं बदल होत आहेत, तर घरगुती गॅस सिलेंडर 8 एप्रिल 2025 रोजी जे बदल झाले, तेच आजवर कायम आहेत.  व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने व्यावसायिक, हॉटेल-रेस्टॉरंट मालकांनी चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा सिलेंडरच्या किंमतीत 111 रुपयांची वाढ झाली होती. 1 फेब्रुवारी रोजी, 14 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 852, दिल्लीत 853, कोलकातामध्ये 879 आणि चेन्नईमध्ये 868 होती, तेच दर आजही कायम आहेत.

हे सुद्धा वाचा : कोणत्या भारतीय नेत्याने सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण केले, जे फक्त ८०० शब्दांचे होते? जाणून घ्या हा इतिहास

दिल्लीत किती भाव?

दिल्लीमध्ये 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,740.50 रुपये इतकी झाली. पूर्वी ही किंमत 1,691.50 रुपये होती. आता किंमतीत 49 रुपयांची वाढ झाली आहे. तर सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला आहे. घरगुती वापरासाठीचा 14.2 किलो वजनी LPG सिलेंडर दिल्लीत आता 853 रुपयांना मिळत आहे. तर BPCL आणि HPCL च्या ग्राहकांना याच किंमतीत सिलेंडर मिळत आहे.

सोने, चांदी झाले स्वस्त

सोने आणि चांदीच्या किंमतीत या आठवड्यात मोठी घसरण झाली. एका झटक्यात दोन्ही धातुच्या किंमती दणकावून आपटल्या. चांदी एकाच दिवसी 30 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली. तर सोन्यात जवळपास 17 टक्क्यांची घसरण झाली. रविवारी बजेटच्या दिवशी शेअर बाजारासह वायदे बाजारात MCX वर सोने-चांदीत ट्रेडिंग होत आहे. बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. 1 किलो चांदीची किंमत बाजार उघडताच अचानक 27,000 रुपयांनी आपटली. तर सोने सुद्धा आपटले. सोन्याच्या किंमतीत 9 हजारांची घसरण झाली.

Web Title: There has been a huge increase in the price of lpg cylinders on the very day of the budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • LPG gas cylinder
  • LPG price
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान
1

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
2

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार
3

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
4

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.