नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रम रविवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमात संसदेची नवी इमारत ही देशाला अर्पण करण्यात येणार आहे. अद्याप या कार्यक्रमाची कार्यक्रम प्रत्रिका जाहीर करण्यात आली नसली, तरी दोन भागात हा उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
[read_also content=”इलॅान मस्क आता मानवामध्ये ब्रेन चिप इम्लांट करणार, मेंदूनं नियंत्रीत होणार संगणक आणि मोबाइल, अंधांनाही दिसणार https://www.navarashtra.com/india/elon-musk-brain-neuralink-get-approval-for-implant-chip-in-humans-computers-and-mobiles-will-be-controlled-by-the-brain-nrps-404591.html”]
उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वी सकाळी संसद आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावळ उभारण्यात आलेल्या मंडपात पूजाविधी करण्यात येणार आहे. या पूजाविधीला नरेंद्र मोदी, ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश आणि काही वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत.
या पूजाविधीनंतर हे मान्यवर लोकसभा आणि राज्यसभेच्या नव्या इमारतीची पाहणी करतील. याचवेळी पवित्र सेंगोल लोकसभेत अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला स्थापित करण्यात येणार आहे. तामिळनाडूतून आलेले संत-महंत यांच्या उपस्थितीत पूजा करुन विधिवत या संगोलची स्थापना करण्यात येईल. यावेळी संगोल निर्मिती करणारे सोनारही या सोहळ्याला उपस्थित असतील. नव्या संसद भवनात यावेळी पूजाविधी आणि प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सकाळी ९.३० पर्यंत हा टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.
दुपारच्या सुमारास राष्ट्रगीतानं संसद भवनाच्या उद्घाटनाचा दुसरा टप्पा नव्या लोकसभेत सुरु होईल. यावेळी नेते, मान्यवर, सेलिब्रिटी अशी देशभरातील मंडळी उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश हे भाषण करतील. त्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जयदीप धनकर आणि राष्ट्रकपती द्रोपदी मुर्मु यांच्या शुभेच्छांच्या संदेशाचं वाचन करण्यात येणार आहे. लोकसभा अध्यक्षांचं भाषणही यावेळी होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणासाठीगही वेळ ठेवण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे कार्यक्रमावर बहिष्कारात सामील झालेले असल्यानं त्यांच्या भाषणासाठी वेळ ठेवण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलंय.
यावेळी या संसद भवनाच्या निर्मितीबाबत आणि या भवनाच्या महत्त्वाबाबतच्या दोन ऑडिओ व्हिडीओ क्लीप्सही दाखवण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमार ७५ रुपयांच्या कॉईनचं उद्घाटन करणार आहेत. ते या भाषणात काय बोलणार, याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर लोकसभेचे सचिव आभार प्रदर्शन करणार आहेत.
काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर 25 इतर पक्षांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं केंद्राला कळवलेलं आहे. एनडीएचे घटक पक्ष असलेले सगळेच पक्षनेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती आहे. यात अपना दल, एआयडीएमके, शिंदे गट, एनपीपी, एनपीएफ, बिजू जनता दल, टीडीपी, वायएसआरसीपी, शइरोमणी अकाली दल, बसपा आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांचे नेते उपस्थिती लावणार आहेत.
या कार्यक्रमाला आजी-माजी लोकसभा-राज्यसभा अध्यक्ष, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सगळ्या मंत्रालयांचे सचिव, रतन टाटा यांच्यासारखे अनेक मान्यवर, सिने अभिनेते, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रणं पाठवण्यात आलेली आहेत. नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं सांगण्यात येतंय.