Justice Yashwant Varma Case News : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेली रोकड सापडल्याच्या वादामुळे त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद येथे बदली करण्यात आली होती.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. संसदेच्या इतिहासात, अध्यक्षांविरुद्ध असे प्रस्ताव यापूर्वी तीन वेळा आणले गेले आहेत, परंतु आतापर्यंत एकही मंजूर झालेला नाही.
No-confidence motion : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अविश्वास ठरावर चर्चा केली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ओम बिरला यांची बाजू घेऊन विरोधकांना खडेबोल सुनावले.
भाजप विरोधी पक्ष मांडणार असलेला अविश्वास प्रस्ताव मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. तसेच सर्व खासदारांची उपस्थिती दर्शवून आपली ताकद दर्शवण्याचा प्रयत्न करेल.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीवरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.
India Bangladesh Relations : भारताचा शेजारी देश बांगलादेशत गेल्या दीड वर्षानंतर नव्या सरकारची स्थापना झाली आहे. तारिक रहमान नवे पंतप्रधान बनले असून भारताने संबंध सुधारण्यासाठी एक मोठे आणि सकारात्मक पाऊल…
सभापतींच्या सर्वात शक्तिशाली घटनात्मक अधिकारांपैकी एक म्हणजे अर्थ विधेयक प्रमाणित करणे. एखादे विधेयक हे 'अर्थ विधेयक' आहे की नाही, हे ठरवण्याचा अंतिम अधिकार केवळ सभापतींनाच असतो.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने १३ देशांच्या सरकारांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध १२० विरोधी खासदारांनी अविश्वास प्रस्ताव मांडला, ज्यामुळे राहुल गांधींना बोलण्यापासून रोखण्याच्या निष्पक्षतेवर आणि खासदारांना निलंबित करण्यावर वाद निर्माण झाला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला महिला शक्तीला घाबरतात असे दिसून आले आहे. अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना विरोधी महिला खासदारांचा एकप्रकारे अपमान केला आहे.
सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात गेले काही दिवस गोंधळ पाहायला मिळाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावासाठी निवेदन मांडले आहे. विरोधकांनी दाखल केलेल्या या निवेदनामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
संसदेचे कामकाज आपल्या परंपरेनुसारच चालेल. संसदेचे मुख्य काम जनहितासाठी कार्य करणे हे आहे. जनहित आणि देशहिताचे कोणतेही काम असेल, तर संसदेची सुटी देखील रद्द केली जाते.
नुकतेच संसदीय हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. मात्र सध्या भारतीय संसदेमध्ये नेत्यांमध्ये चर्चा कमी आणि भांडण जास्त होत आहेत. हुज्जत, भांडण आणि रुसणे फुगणे यामध्ये जास्त वेळ जातो आहे.
महाराष्ट्रातील मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या स्व: संरक्षणाच्या हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवात आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाली. त्यावेळी त्यांनी या मोहिमेचे कौतुक करताना विविध मुद्द्यांवर भाष्य…
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज घोषणा केली की हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय…