Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Former PM funeral News: ‘ते’ तीन पंतप्रधान ज्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले नाहीत….

मनमोहन सिंग सरकारमधील मंत्री सुबोधकांत सहाय सिंग यांना त्यांचया अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर सिंह यांचे स्मारक बांधण्याचीही चर्चा होती, मात्र दिल्लीत ते बांधता आले नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 28, 2024 | 02:36 PM
Former PM funeral News: ‘ते’ तीन पंतप्रधान ज्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले नाहीत….
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाबाबत राजकारण तापले आहे. मनमोहन यांच्या अंत्यसंस्कारात केंद्र सरकारने परंपरा पाळली नाही, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मनमोहन यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी यमुना नदीच्या किनारी जमीन देण्याची काँग्रेसची मागणी होती. पण केंद्र सरकारने याला विरोध करत तिथे जमीन देण्यास नकार दिला. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वादावादीही झाली. मात्र, देशाच्या राजकारणात पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे तीन पंतप्रधान झाले आहेत, ज्यांचे अंतिम संस्कार दिल्लीबाहेर करण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांना स्मारक बांधण्यासाठी जागाही देण्यात आली नाही. यातील पहिले नाव आहे नरसिंह राव यांचे.

– पीव्ही नरसिंह राव

1991 ते 1996 पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले पी.व्ही. नरसिंह राव यांचे डिसेंबर 2004 मध्ये निधन झाले. त्यावेळी दिल्लीत मनमोहन सिंग यांचे नवे सरकार स्थापन झाले होते. राव यांच्या कुटुंबीयांना दिल्लीतच त्यांचे अंत्यसंस्कार करायचे होते, परंतु काँग्रेसशी संबंधित वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती की राव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीऐवजी हैदराबादमध्ये व्हावे. याबाबत दिल्लीत मोठा गोंधळ उडाला होता. विनय सीतापती त्यांच्या ‘हाफ लायन: नरसिंह राव’ या पुस्तकात लिहीले आहे की, “24 डिसेंबर 2004 रोजी मनमोहन सिंग यांनी राव यांच्या मुलाला त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल विचारले तेव्हा राव यांच्या मुलाने सांगितले की त्यांचे वडील पंतप्रधान होते आणि कुटुंबाच्या इच्छा पूर्ण झाल्या. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतच अंत्यसंस्कार होणार आहेत.

Manmohan Singh’s funeral: अर्थविश्वातला तारा निखळला…; मनमोहन सिंग अनंतात विलीन

मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या म्हणण्यानुसार, “मनमोहन सिंग यांनाही पी.व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतच करण्याची इच्छा होता. पण पक्षाच्या नेत्यांच्या दबावामुळे ते काही बोलू शकले नाहीत. शेवटी, आंध्र प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते वाय.एस. रेड्डी यांच्या पुढाकाराने सिंह यांच्या पार्थिवावर दिल्लीऐवजी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसच्या राजवटीत दिल्लीत रावांचे स्मारक बांधण्याची चर्चा होती, पण तेही पूर्ण होऊ शकले नाही.

– मोरारजी देसाई

1977 ते 1979 या काळात पंतप्रधान राहिलेल्या मोरारजी देसाई यांचे 1995 मध्ये मुंबईतील जसलोक रुग्णालयात निधन झाले. मोरारजींच्या कुटुंबीयांच्या इच्छेमुळे साबरमतीच्या तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोरारजींच्या अंत्यसंस्काराला तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव उपस्थित होते.अंत्यसंस्कारानंतर मोरारजींच्या अस्थी दिल्लीत आणण्यात आल्या. त्यावेळी त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारण्याची चर्चा होती. मात्र, दिल्लीतही मोरारजींचे स्मारक होऊ शकले नाही.

Bangladesh violence: युनूस सरकारचे हिंदूंविरोधी आणखी एक षडयंत्र; बांगलादेशात पोलीस भरतीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

– व्ही.पी. सिंह

1989 ते 1990 पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले व्ही.पी सिंह यांचे 2008 मध्ये दिल्लीत निधन झाले. सिंग यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याची चर्चा होती, पण अखेर त्यांना अलाहाबादला नेण्यात आले. त्या वेळी घरच्यांच्या इच्छेमुळे मांडूच्या राजाचे अंतिम संस्कार प्रयागराज येथील संगमाच्या तीरावर करण्यात आल्याचे सांगितले जाते. पी.व्ही. नरसिंह राव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, परंतु सरकारचा एक प्रतिनिधी कॅबिनेट मंत्र्याच्या रूपात येथे पाठवण्यात आला होता. त्यावेळी मनमोहन सिंग सरकारमधील मंत्री सुबोधकांत सहाय सिंग यांना त्यांचया अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर सिंह यांचे स्मारक बांधण्याचीही चर्चा होती, मात्र दिल्लीत ते बांधता आले नाही. 2023 मध्ये एम.के. स्टॅलिन यांच्या सरकारने तामिळनाडूमध्ये व्ही.पी. सिंह यांचा भव्य पुतळा बसवला आहे. व्ही.पी. हे काँग्रेसचे कट्टर विरोधक मानले जात होते. 1989 मध्ये व्ही.पीं.नी राजीव गांधींच्या विरोधात मोर्चे काढले होते.

दिल्लीत या पंतप्रधानांवर झाले अंत्यसंस्कार

जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंग, राजीव गांधी, आय.के. गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतच झाले. यापैकी नेहरू, शास्त्री, इंदिरा, चौधरी चरण, चंद्रशेखर, राजीव गांधी आणि अटलबिहारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली होती. या पंतप्रधानांशिवाय संजय गांधी यांच्यावरही राजघाटावर अंत्यसंस्कार झाले. संजय लोकसभा खासदार आणि काँग्रेसचे सरचिटणीस होते.

Tumbbad 2: ‘तुंबाड २’ साठी प्रेक्षकांना करावी लागेल प्रतीक्षा? सोहम शाहने चित्रपटाच्या

 

Web Title: Those three prime ministers who were not funeral in delhi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • Manmohan singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.