Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: ‘आज उत्तर प्रदेश गुन्हेगारी, गुंडगिरी, माफियामुक्त..’; योगी आदित्यनाथ

शेतकरी आत्महत्येपर्यंत, तरुण बेरोजगारीने त्रस्त आणि महिलांची असुरक्षितता ही राज्याची ओळख बनली होती. आज उत्तर प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या देशाचे हृदयस्थळ नाही, तर नव्या भारताची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक ओळख बनत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 29, 2025 | 04:46 PM
Uttar Pradesh: ‘आज उत्तर प्रदेश  गुन्हेगारी, गुंडगिरी, माफियामुक्त..’; योगी आदित्यनाथ
Follow Us
Follow Us:

देवरिया (उत्तर प्रदेश):  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवरिया जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास केले. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि धनादेशाचे वितरणही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री योगींनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारवर जोरदार टीका केली.

२०१७ पूर्वी देवरियाची अवस्था बिकट होती- योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ पूर्वी देवरिया अराजकतेच्या आणि मागासलेपणाच्या गर्तेत होता. येथेले शेतकरी स्थलांतर करण्यास भाग पडले होते. दुर्गा पूजा, होळीसारख्या सणांमध्ये लोक भीतीच्या छायेत राहत होते. घराबाहेर पडणे सुद्धा धोकादायक वाटत होते. परंतु भाजप सरकार आल्यापासून स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज देवरिया दंगामुक्त आणि माफियामुक्त झाला आहे. मुख्यमंत्री योगींनी विकास कार्यांचे कौतुक करताना सांगितले की, जिल्ह्यात नुकतेच एक चार मजली डिग्री कॉलेज सुरू झाले आहे. हे देवरियातील पहिले असे कॉलेज आहे ज्यामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये एकत्रित शिक्षण मिळणार आहे.

Delhi Politics: खासगी शाळांच्या मनमाफी फी वाढीला लागणार लगाम..; दिल्लीत लागू होणार ‘फी कायदा’

“विकास हीच भाजपची ओळख”

मुख्यमंत्री योगींनी सांगितले की, देवरिया जिल्ह्यातील हे प्रकल्प स्थानिकांना प्रगतीची नवी दिशा देतील. आज भाजपची ओळख विकासाशी जोडली गेली आहे. राज्यात विविध एक्सप्रेस वे प्रकल्प राबवले जात आहेत. देवरियामध्येही लवकरच एक नवीन एक्सप्रेस वे सुरू होणार असून, त्यामुळे देवरियाहून थेट दिल्ली किंवा शामलीकडे जाणे अधिक सुलभ आणि जलद होईल. या महामार्गाला चार पदरी रस्त्यांशी जोडले जाणार आहे. या घडामोडींमुळे देवरिया जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधा यामध्ये मोठा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री योगींनी सांगितले की, आज उत्तर प्रदेशकडे देशातील सर्वात मोठे एक्सप्रेसवे नेटवर्क आहे. राज्यात सर्वाधिक मेट्रो सेवा सुरू आहेत. रेल्वेचे सर्वात मोठे जाळे देखील उत्तर प्रदेशात आहे. देशातील पहिली रॅपिड रेल आणि पहिले इनलॅंड वॉटरवेज देखील याच राज्यात सुरु आहेत. भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ४५ पेक्षा अधिक योजनांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. “हे नवे उत्तर प्रदेश, नव्या भारताचे प्रतीक आहे. आणि हेच उत्तर प्रदेश आता आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश देशातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, पण आज ती देशातील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. २०२९ पर्यंत उत्तर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होईल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.” असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.

Pegasus Case : ‘स्पायवेअरचा वापर चुकीचा नाही, पण…’; पेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

२०१४ पूर्वीचा उत्तर प्रदेश – एक ओळखीच्या संघर्षात अडकलेला राज्य

मुख्यमंत्री योगींनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, २०१४ पूर्वी उत्तर प्रदेश ओळखीच्या संघर्षातून जात होता. “ज्यांचा अजेंडा विकास नव्हता, त्यांनी उत्तर प्रदेशवर आपली इच्छित व्यवस्था लादली. त्यामुळे शेतकरी आत्महत्येपर्यंत, तरुण बेरोजगारीने त्रस्त आणि महिलांची असुरक्षितता ही राज्याची ओळख बनली होती. आज उत्तर प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या देशाचे हृदयस्थळ नाही, तर नव्या भारताची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक ओळख बनत आहे.”

Web Title: Today uttar pradesh is crime hooliganism mafia free yogi adityanath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Uttar Praadesh Crime
  • Uttar Pradesh
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
1

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?
2

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
3

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral
4

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.