Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीतील वास्तव्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी विशेष खाद्यपदार्थांची तयारी केली आहे. पुतिन यांच्या आगमनाची पुष्टी झाल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ पारंपरिक भारतीय मिठाईंची एक विशेष थाळी तयार करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2026 | 08:06 AM
BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारताने आयोजित केलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी (दि.12) दुपारी दिल्लीत दाखल होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहे. यापूर्वी, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि आफ्रिकन देश नायजेरिया येथील इतर अनेक पाहुणेही भारतात दाखल झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठे बदल, बदलत्या व्यापार पद्धती, जलद तांत्रिक प्रगती आणि हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स गट आज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. त्यांनी याला ‘ग्लोबल साउथ’ (विकसनशील देश) साठी अधिक लवचिक, वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आर्थिक भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी म्हटले. सध्याची जागतिक परिस्थिती जगभरातील देशांना आणि कंपन्यांना वस्तू कोठून खरेदी कराव्यात, उत्पादन कोठे करावे आणि गुंतवणूक कोठे करावी याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहे.

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

रामाफोसा पुढे म्हणाले की, हा काळ ब्रिक्स देशांना जुन्या आर्थिक सीमांमधून मुक्त होण्याची संधी देत ​​आहे. ब्रिक्स देशांचे उद्दिष्ट केवळ परस्पर व्यापार वाढवणे हे नसावे, तर अर्थव्यवस्थांमध्ये अधिक सखोल उत्पादक संबंध प्रस्थापित करणे हे देखील असावे.

विकसनशील देशांनी केवळ ग्राहक बनू नये

विकसनशील देशांनी केवळ कच्च्या मालाचे निर्यातदार किंवा तयार मालाचे ग्राहक बनून राहू नये. आतापर्यंत जागतिक मूल्य साखळीतील तांत्रिक विकास आणि उच्च-मूल्य उत्पादन हे काही निवडक देशांपुरतेच मर्यादित राहिले आहे. विस्तारित ब्रिक्सने हा जुना नमुना पुन्हा टाळला पाहिजे. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात, आर्थिक सहकार्य केवळ सरकारांपुरते मर्यादित राहणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ब्रिक्स बिझनेस कौन्सिलची स्थापना करण्यात आली होती.

पुतिन यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील हॉटेलमध्ये विशेष तयारी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीतील वास्तव्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी विशेष खाद्यपदार्थांची तयारी केली आहे. पुतिन यांच्या आगमनाची पुष्टी झाल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ पारंपरिक भारतीय मिठाईंची एक विशेष थाळी तयार करण्यात आली आहे. या विशेष थाळीमध्ये भारताच्या खाद्यसंस्कृतीचा वारसा दर्शवणाऱ्या पारंपरिक मिठाईंचा समावेश आहे. यासोबतच भारतीय मसाल्यांनी तयार केलेले चॉकलेट बॉनबॉन्स देखील दिले जातील. यामध्ये वेलची, केशर, गुलाब, आले आणि बडीशेप यांसारख्या मसाल्यांचा समावेश आहे.

Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?

Web Title: Top leaders from many countries including indonesia philippines visit india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Brics Council
  • national news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
1

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद
2

BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच
3

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!
4

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.