Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…

शेख सज्जाद गुलचा जन्म १९७४ मध्ये श्रीनगरमध्ये झाला होता. श्रीनगरमध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सज्जादने बंगळुरूच्या एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी देखील मिळवली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2025 | 04:00 PM
Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते.  दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात.

इंडियन मुजाउद्दीन आणि लष्कर ए तोयबा यांच्यामधून टीआरएफ दहशतवादी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे काम काश्मीरमधील युवकांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवून त्यांना गोरील्ला लढाईचे ट्रेनिंग देणे हे आहे. टीआरएफच्या संस्थापकांमध्ये हाफिज मुहम्मद सईद, झकीउर रहमान लखवी आणि काश्मीरचे रहिवासी शेख सज्जाद गुल यांचा समावेश आहे.

शेख सज्जाद गुलचा जन्म १९७४ मध्ये श्रीनगरमध्ये झाला होता. श्रीनगरमध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सज्जादने बंगळुरूच्या एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी देखील मिळवली. पण २००१ मध्ये तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या जवळ आला. टीआरएफ सध्या सज्जाद चालवत आहे. सज्जाद हा दहशतवादी हाफिज सईदचा उजवा हात मानला जातो. याच संघटनेने काल पहलगाम येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट तर…

सज्जादच्या नेतृत्वात टीआरएफने अनेक हल्ले घडवून आणले आहेत. २०२० मध्ये भाजप नेत्याची हत्या व २०२३ मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या, तसेच २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात देखील टीआरएफचे नाव समोर आले होते. टीआरएफचे दहशतवादी अनेक बाबतीत इतर दहशतवादी संघटनांपेक्षा वेगळे आहेत. येथील लोक जास्त स्थानिक आणि कमी धार्मिक दिसतात. त्यामुळे एजन्सीचे त्यांच्याकमी कमी प्रमाणात लक्ष जात असे म्हटले जाते.

लादेनशी काय आहे कनेक्शन? 

टीआरएफ या दहशतवादी संघटनेचे ओसामा बिन लादेनशी देखील संबंध असल्याचे म्हटले जाते. टीआरएफचे जगातील सर्वात मोठा दहशतवादी आणि अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनशी चांगले संबंध होते. लादेनने त्याच्या हयातीत अनेक दहशतवादी संघटना स्थापन करण्यास मदत केली. ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा देखील एक संघटना आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट

 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

Web Title: Trf terrorist organization connection with trf pahalgam terror attack jammu kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Osama bin Laden
  • Pahalgam Terror Attack
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
2

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
3

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

Crackdown On Smuggling: खजूर आणि सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून घुसखोरी; दहशतवादाचा नवा पॅटर्न
4

Crackdown On Smuggling: खजूर आणि सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून घुसखोरी; दहशतवादाचा नवा पॅटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.