Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमधल्या दोन नागरिकांची भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरी, एसएसबीच्या जवानांकडून अटक

भारतात घुसलेल्या दोन चीनी नागरीकांना एसएसबीच्या जवानांनी अटक (2 Chinese People Arrested) केली. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेजण गेले १५ दिवस दिल्लीत बेकायदेशीररित्या फिरत होते.

  • By साधना
Updated On: Jun 13, 2022 | 02:26 PM
चीनमधल्या दोन नागरिकांची भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरी, एसएसबीच्या जवानांकडून अटक
Follow Us
Close
Follow Us:

बेकायदेशीररीत्या नेपाळ सीमेवरून (India- Nepal Border) भारतात घुसलेल्या दोन चीनी नागरीकांना एसएसबीच्या जवानांनी अटक (2 Chinese People Arrested) केली. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेजण गेले १५ दिवस दिल्लीत बेकायदेशीररित्या फिरत होते. ते दोघे नेपाळला (Nepal) परतत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीच्या वेळी दोघेही सीतामढीमार्गे भारतात दाखल झाले आणि खासगी कारने दिल्लीला गेल्याचे समोर आले आहे.  यादरम्यान सीमेवर गस्त घालणाऱ्या एसएसबीच्या जवानांनी दोघांनाही अटक केली. एसएसबीच्या जवानांनी दोघांना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

[read_also content=”Video – सिग्नेचर स्टेप्स आणि कमालीची ऊर्जा, गोविंदाच्या नव्या गाण्याचं चाहत्यांकडून कौतुक https://www.navarashtra.com/movies/govinda-showed-signature-moves-in-new-sonf-prem-karun-chhu-nrsr-292022.html”]

लू लांग आणि यूआन हेलांग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. दोन्ही तरुणांकडे नेपाळला गेलेल्या व्हिसा क्रमांक EA5390986 आणि BA9887948 व्यतिरिक्त एक काळे कापड, दोन मोबाईल, मोबाईल पॉवर बँक, विविध कंपन्यांचे अर्धा डझन भारतीय सिम, १०३ डॉलर, पाचशे भारतीय चलन, एटीएम कार्ड, सिगारेट, औषध आणि इकॉनॉमी क्लासचा बोर्डिंग पास आढळून आला आहे.

दोन्ही तरुणांनी पोलीस चौकशीत सांगितले की, ते चीनमधून थायलंडमार्गे काठमांडूला पोहोचले. तेथून ते सायकलने भिथामोड सीमेपर्यंत गेले. भारतीय हद्दीत आल्यानंतर त्यांनी २५ मे रोजी नोएडा येथील जेपी ग्रीन नावाच्या ठिकाणी भाड्याने कार घेतली. दोघे त्यांची दिल्लीतील मैत्रिणी कॅरीकडे गेले. त्यांची मैत्रीण कॅरी नोएडामध्ये मोबाईल फॅक्टरीसह टोन सांग रेन जियान नावाचा गाण्याचा क्लब देखील चालवते. तेथे १५ दिवस राहिल्यानंतर, कारने भिट्टामोरला परत आले.

Web Title: Two chinese arrested near india nepal border nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2022 | 02:24 PM

Topics:  

  • India Nepal Border

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.