श्रीनगर(Shrinagar)मधील बेमिना भागात सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तौयबाचे (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवादी ठार झाले. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला आहे. ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) लक्ष्य करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले, पाकिस्तानस्थित (Pakistan) मास्टर्सने हल्ला करण्याच्या उद्देशाने पहलगाम अनंतनाग येथून स्थानिक दहशतवादी आदिल हुसैन मीरसह लष्कर-ए-तौयबाच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठवले होते. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन पोलिसांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला लष्कर-ए-तौयबाचा दहशतवादी (Terrorist) आदिल पर्रे रविवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. यासह जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या एकाच दिवसात तीन झाली.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अदिल हुसेन मीर असून तो अनंतनागचा रहिवासी होता. तर, अब्दुल्ला गौहरी हा पाकिस्तानातील फैजाबाद येथील असल्याचे सांगण्यात आले.