Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

Indian Intelligence Agencies Warn ISI SPY Network : पाकिस्तान आता भारताविरुद्ध मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम राबवण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये सशस्त्र दलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 05, 2026 | 02:35 PM
ISI Spy Network Alert Pakistan's Plan B to create a Bangladesh-like situation in India Use of honey trap to defame the army

ISI Spy Network Alert Pakistan's Plan B to create a Bangladesh-like situation in India Use of honey trap to defame the army

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेश आणि नेपाळप्रमाणेच भारतात जनक्षोभ उसळवून अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने कंबर कसली आहे.
  •  भारतीय लष्करी अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ आणि पैशांचे आमिष दाखवून हेरगिरीचे जाळे विस्तारले जात आहे.
  • भारतीय सशस्त्र दलांविरुद्ध सोशल मीडियावर खोटा प्रचार करून जनतेचा लष्करावरील विश्वास उडवण्याचा आयएसआयचा मोठा प्लॅन उघड झाला आहे.

ISI honey trap Indian Army news : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) पाकिस्तानच्या नापाक इराद्यांबाबत एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सीमेवरून दहशतवादी पाठवण्यात वारंवार अपयश आल्यानंतर आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) भारतामध्ये ‘अंतर्गत अस्थिरता’ निर्माण करण्यासाठी नवीन रणनीतीवर काम करत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर निदर्शने घडवून सत्तांतर किंवा अराजकता निर्माण करण्यात आली, तसाच प्रयोग भारतात करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

लष्कराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

आयडीआरडब्ल्यू (IDRW) च्या अहवालानुसार, पाकिस्तान आता केवळ शस्त्रास्त्रांनी युद्ध न लढता ‘माहिती युद्ध’ (Information Warfare) लढत आहे. भारतीय सशस्त्र दलांना (Indian Armed Forces) बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात आहे. लष्करी मोहिमांबद्दल संभ्रम निर्माण करणे आणि लष्कराने मानवाधिकार उल्लंघन केल्याचे खोटे दावे करणे, हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. यामुळे सामान्य जनतेचा सैन्यावरील विश्वास कमी व्हावा, असा आयएसआयचा कुटील डाव आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर

हनी ट्रॅप: हेरगिरीचे सर्वात घातक शस्त्र

गुप्तचर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारतीय अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ (Honey Trap) चा वापर प्राथमिक शस्त्र म्हणून करत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल्स तयार करून लष्करी कर्मचाऱ्यांशी मैत्री केली जाते आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून गोपनीय माहिती मिळवली जाते. ज्या व्यक्ती आर्थिक अडचणीत आहेत किंवा ज्यांचा सरकारी धोरणांना विरोध आहे, अशा ‘सॉफ्ट टार्गेट्स’ना आयएसआय मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढत आहे.

In view of what has happened in delhi blast it is becoming very clear ISI will train home grown terror amongst disgruntled youth to target India .I have reports from credible source to suggest the presence of Pakistani Generals and brigadiers in Chittagong and Dhaka . ISI is 1/2 pic.twitter.com/hV2cQLRbeZ — Pradyot_Tripura (@PradyotManikya) November 11, 2025

credit : social media and Twitter

बांगलादेश आणि नेपाळ मॉडेलचा धोका

पाकिस्तानची नजर आता केवळ काश्मीरवर नसून भारताच्या ईशान्येकडील राज्यांवरही आहे. बांगलादेशातील अस्थिरतेचा फायदा घेऊन तिथे ‘लाँच पॅड’ तयार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतात हिंसाचार घडवण्यासाठी स्थानिक स्तरावर गट तयार केले जात आहेत. फरीदाबादमध्ये अलीकडेच पकडलेले ‘स्वदेशी दहशतवादी मॉड्यूल’ (Indigenous Terror Module) हे याच कटाचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानला अशा प्रकारे हिंसाचार घडवायचा आहे जेणेकरून जागतिक स्तरावर ते हात झटकू शकतील आणि याला भारताचा ‘अंतर्गत प्रश्न’ म्हणून हिणवू शकतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर

भारत सज्ज: ‘राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण’ लागू

पाकिस्तानच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताच्या गृह मंत्रालयाने कडक पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच ‘राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण’ जाहीर केले आहे. याअंतर्गत ‘राष्ट्रीय तपास संस्थे’ने (NIA) राज्यांमध्ये विशेष एटीएस (ATS) पथके तयार केली आहेत. सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांना या नव्या धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून आयएसआयचे हेरगिरीचे जाळे मुळापासून उखडून टाकता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयएसआय भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती कशी निर्माण करू इच्छित आहे?

    Ans: आयएसआय स्थानिक लोकांना भडकवून, सरकारी धोरणांविरुद्ध हिंसक निदर्शने घडवून आणि भारतीय लष्कराची प्रतिमा मलिन करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Que: 'हनी ट्रॅप' म्हणजे काय?

    Ans: यामध्ये महिलांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाती उघडून लष्करी किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी जवळीक साधली जाते आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून गोपनीय माहिती चोरली जाते.

  • Que: भारत सरकारने या धोक्यावर काय उपाययोजना केल्या आहेत?

    Ans: गृह मंत्रालयाने 'राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण' सुरू केले असून एनआयए (NIA) आणि राज्यांच्या एटीएस (ATS) पथकांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

Web Title: Isi spy network alert pakistans plan b to create a bangladesh like situation in india use of honey trap to defame the army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • india
  • international news
  • ISI
  • pakistan
  • third world war

संबंधित बातम्या

US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर
1

US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर

Iran Protests : इराणमध्ये क्रांतीची ठिणगी! सर्वोच नेते खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत; मोसादचा धाडसी खुलासा
2

Iran Protests : इराणमध्ये क्रांतीची ठिणगी! सर्वोच नेते खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत; मोसादचा धाडसी खुलासा

Venezuela : व्हेनेझुएला बनली युद्धभूमी! 32 क्युबन सैनिकांचा बळी घेतल्यावर Trumpचा ‘व्हिक्टरी’ मेसेज, दादागिरीची हद्द पार
3

Venezuela : व्हेनेझुएला बनली युद्धभूमी! 32 क्युबन सैनिकांचा बळी घेतल्यावर Trumpचा ‘व्हिक्टरी’ मेसेज, दादागिरीची हद्द पार

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.