केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे एकाचवेळी सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; मोठा निर्णय होणार?
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. हल्ला झाल्यानंतर भारताने मोठे निर्णय घेतले आहेत. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
तुमच्या तुमच्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा, अशा सूचना अमित शहांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल समझोता करार स्थगित करण्यात आला आहे. याबद्दलचं औपचारिक पत्र भारताकडून पाकिस्तान सरकारला पाठवण्यात आलं आहे. यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेला व्हिसा रद्द केला गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीची बैठक झाली. त्यामध्ये अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यात सिंधू जल समझोता स्थगित करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९६० मध्ये सिंधू जल सामंजस्य करार झाला. त्यावेळीच तो लागू करण्यात आला. सिंधू नदी पाकिस्तानसाठी लाईफ लाईन आहे. जवळपास २१ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पाण्याची गरज सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्या पूर्ण करतात. त्यामुळे सिंधू नदी पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
पुण्यात 100 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक
ण्यात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर देशात राहत पाकिस्ताविरोधात कडक भूमिका घेत भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले जात असतानाच पुण्यातून 3 नागरिकांनी देश सोडला आहे. तर पुण्यात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या परदेशी नागरिकांत मुस्लिम, सिंधी व हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे.