Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोरखपूर विमानतळाच्या गैरव्यवस्थापनाचा केंद्रीयमंत्र्यांना फटका; मंत्रिमहोदयांसह 220 प्रवासी दीड तास विमानात अडकले

उष्णता आणि आर्द्रतेमुळे प्रवाशांची अवस्था दयनीय झाली होती. खराब व्यवस्थापनामुळे तिथे आधीच पार्क केलेली विमाने संध्याकाळी 5.25 च्या सुमारास काढता आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2025 | 02:44 PM
केंद्रीय मंत्र्यांसह २२० प्रवासी दीड तास विमानात अडकले

केंद्रीय मंत्र्यांसह २२० प्रवासी दीड तास विमानात अडकले

Follow Us
Follow Us:

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर विमानतळाच्या खराब व्यवस्थेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले. विमानात असलेल्या 220 प्रवाशांना दीड तासांहून अधिक काळ विमानात अडकून राहावे लागले. या विमानात केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा देखील उपस्थित होते. गोरखपूर विमानतळाच्या खराब व्यवस्था समोर आल्याची ही पहिलीच वेळ नाही, हे यापूर्वीही अनेकदा घडले आहे.

दिल्लीहून गोरखपूरला जाणारे इंडिगोचे विमान गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास गोरखपूर विमानतळावर उतरणार होते. उड्डाणाला उशीर झाल्यामुळे ते 4.05 वाजता उतरू शकले. विमानतळावर अॅप्रन रिकामा नसल्याने विमान टॅक्सीवेवरच थांबवावे लागले. यामुळे सर्व प्रवासी विमानातच अडकून राहिले.

दरम्यान, उष्णता आणि आर्द्रतेमुळे प्रवाशांची अवस्था दयनीय झाली होती. खराब व्यवस्थापनामुळे तिथे आधीच पार्क केलेली विमाने संध्याकाळी ५.२५ वाजताच्या सुमारास काढता आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता विमानात अडकलेले प्रवासी बाहेर येऊ शकले.

मंत्र्यांनी प्रश्न केले उपस्थित 

गोरखपूर विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड संताप होता. केंद्रीयमंत्रीही संतापलेले दिसले. त्यांनी विमानतळाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले? इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान संध्याकाळी सात वाजता नंतरच दिल्लीला परत येऊ शकले. केंद्रीय मंत्री बीएल वर्मा देखील याच विमानाने परतले.

खराब व्यवस्था पुन्हा एकदा उघडकीस

उत्तर प्रदेशातील गोरखपूर विमानतळाची खराब व्यवस्था पुन्हा एकदा उघडकीस आली. गुरुवारी रात्री इंडिगो एअरच्या विमानातील प्रवासी विमानतळावर पोहोचूनही दीड तास विमानात अडकून राहिले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या विमानात केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा देखील उपस्थित होते. विमानात असलेल्या 220 प्रवाशांना दीड तासांहून अधिक काळ विमानातच कोंडून राहावे लागले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुरुवारी संध्याकाळी गोरखपूर विमानतळावर प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. याचे कारण विमानतळाचे खराब व्यवस्थापन होते. दिल्लीहून गोरखपूरला जाणारे इंडिगोचे विमान दुपारी 3.15 वाजता गोरखपूर विमानतळावर उतरणार होते. उड्डाणाला उशीर झाल्यामुळे ते 4.05 वाजताच उतरू शकले. यानंतर, विमानातील अनेक प्रवासी यात अडकून पडले.

Web Title: Union minister hit by mismanagement of gorakhpur airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:44 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Money Management Tips : सॅलरी कितीही असू द्या, तुमचं बँक अकाउंट कधीच खाली होणार नाही! वापरा 50-20-30 मॅजिकल फॉर्म्युला
1

Money Management Tips : सॅलरी कितीही असू द्या, तुमचं बँक अकाउंट कधीच खाली होणार नाही! वापरा 50-20-30 मॅजिकल फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.