Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; आता ‘या’ दिवशी घेतली जाणार परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) यूपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला होता. ⁠यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा  20 सप्टेंबर रोजी  पेपर झाला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 11, 2024 | 07:50 AM
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकात केले बदल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकात केले बदल

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, UPSC 2025 च्या वार्षिक वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. हे सुधारित वेळापत्रक https://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेदेखील वाचा ; गरिब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची चिंता मिटली; केंद्र सरकारकडून ‘विद्यालक्ष्मी योजना जाहीर; काय आहे योजना?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या वेळापत्रकानुसार नागरी सेवांच्या प्राथमिक परीक्षेसाठीची नोंदणी आता 22 जानेवारी रोजी सुरू होणार असून, परीक्षा 25 मे 2025 रोजी पार पडेल. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही ‘यूपीएससी’ ने आपले वेळापत्रक बदलले होते. नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा आणि भारतीय वनसेवा (प्राथमिक) परीक्षा यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया 22 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, प्रत्यक्ष परीक्षा 25 मे रोजी घेतली जाणार आहे.

नागरी सेवेसाठीची मुख्य परीक्षा 22 ऑगस्टला होणार आहे. तसेच भारतीय वन सेवेसाठीची मुख्य परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 ला होईल. या नव्या वेळापत्रकानुसार लष्करात अधिकारी पदावर जाण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांच्या परीक्षेच्या तारखाही बदलल्या आहेत. त्यानुसार एनडीए, एनए आणि सीडीएस या परीक्षांची अधिसूचना 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असणार आहे.

वैद्यकीय सेवा परीक्षेच्या तारखाही जाहीर

नव्या वेळापत्रकात संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेबाबतच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना 19 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 11 मार्च असेल. तर लेखी परीक्षा 20 जुलै 2025 रोजी होणार आहे. आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया 12 फेब्रुवारी ते 4 मार्च असेल. त्यानुसार, ही परीक्षा 20 जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यूपीएससी ही एक नागरी सेवा परीक्षा

UPSC ही राष्ट्रीय स्तरावरील एक सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आहे ज्याद्वारे 24 सेवांमध्ये भरती केली जाते. IAS, IPS, IRS अश्या एकूण 24 सेवांची भरती यूपीएससी परीक्षेआधारीत केली जाते. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परिक्षांपैकी यूपीएससी एक आहे. यूपीएससी ही एक स्वतंत्र संस्था आहे.

यूपीएससीचा पेपरफुटल्याचा आरोप

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) यूपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला होता. ⁠यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा  20 सप्टेंबर रोजी  पेपर झाला होता. मात्र, निबंधाचा पेपप रद्द करण्याची मागणी परीक्षार्थींकडून केली जात आहे. कारण, खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाल्याचा आरोप परीक्षार्थींकडून करण्यात आला होता.

हे देखील वाचा : प्रचार सभांमधील घोषणांवरुन रंगलं राजकारण! योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर

Web Title: Union public service commission exam schedule changes again nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • Exam Schedule

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.