Bomb Threat: कोलकाता एअरपोर्टवर हाय अलर्ट; INDIGO च्या 'या' फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी
कोलकाता: सध्या गेल्या काही दिवसांपासून विमानाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशीच पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी इंडिगो विमानाला मिळाली आहे. कोलकातावरुण मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे.
कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर आज दुपारी हाय अलर्ट जारी करण्यात आला. कोलकाता ते मुंबई या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. अज्ञात व्यक्तीने हा फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अशी धमकी मिळताच सीआयएसएफने तपासणी सुरू केली.
कोलकातावरून मुंबईला जाणारी फ्लाईट दुपारी 1.30 वजा उड्डाण करणार होते आणि 4.20 ला मुंबईत लँड होणार होते. मात्र फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळताच 195 प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. सुरक्षा दलाने विमानाची तपासनाई केली. बॉम्ब शोधक पथक दाखल झाले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विमान टेक ऑफ झाल्यानंतर एका वृद्ध महिलेची अचानक तब्येत उघडल्याने इंडिगो कंपनीला आपले विमान चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले.
हे विमान मुंबईवरून वाराणसी जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये उत्तर प्रदेशमधील मिर्जापुर येथे राहणाऱ्या एक महिले मुंबईतून वरणसिकडे प्रवास सुरू केला आहे. मात्र फ्लाइटने टेक ऑफ घेतल्यानंतर तया महिलेला अस्वस्थ जाणवू लागले. क्रू मेंबर्सने ही बाब पायलटच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पायलटने हे विमान छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाणा येथे लँड करण्याचा निर्णय घेतला.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग; नेमके कारण काय?
स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास
देशातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात विमान प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. एअरलाइन्सच्या ‘स्टुडंट स्पेशल’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अधिक परवडणारा आणि सोपा करण्यात आला आहे. अधिक किफायतशीर हवाई सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इंडिगो वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करावे लागेल. सध्या ही सुविधा केवळ इंडिगो वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध आहे.
इंडिगोचे विमान टेक ऑफ झाल्यानंतर एक वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले. रूग्णाला उपचारांसाठी नेत असताना त्याचा विमानातच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे विमान मुंबई ते वाराणसी असे जाणारे होते.