(फोटो - सोशल मिडिया)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विमान टेक ऑफ झाल्यानंतर एका वृद्ध महिलेची अचानक तब्येत उघडल्याने इंडिगो कंपनीला आपले विमान चिखलठाणा विमानतळावर इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले आहे.
इंडिगोचे विमान टेक ऑफ झाल्यानंतर एक वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले. रूग्णाला उपचारांसाठी नेत असताना त्याचा विमानातच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे विमान मुंबई ते वाराणसी असे जाणारे होते.
हे विमान मुंबईवरून वाराणसी जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये उत्तर प्रदेशमधील मिर्जापुर येथे राहणाऱ्या एक महिले मुंबईतून वरणसिकडे प्रवास सुरू केला आहे. मात्र फ्लाइटने टेक ऑफ घेतल्यानंतर तया महिलेला अस्वस्थ जाणवू लागले. क्रू मेंबर्सने ही बाब पायलटच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पायलटने हे विमान छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाणा येथे लँड करण्याचा निर्णय घेतला.
स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास
देशातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात विमान प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. एअरलाइन्सच्या ‘स्टुडंट स्पेशल’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अधिक परवडणारा आणि सोपा करण्यात आला आहे. अधिक किफायतशीर हवाई सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इंडिगो वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करावे लागेल. सध्या ही सुविधा केवळ इंडिगो वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध आहे.
आनंदाची बातमी! स्वस्त दरात करता येणार विमान प्रवास; इंडिगोने सुरु केलाय ‘हा’ विशेष उपक्रम!
‘विद्यार्थी विशेष’ कार्यक्रमासाठी काय आहे पात्रता?
‘विद्यार्थी विशेष’ कार्यक्रमाचा लाभ केवळ तेच विद्यार्थी घेऊ शकतात. ज्यांचे वय किमान 12 वर्षे असावे आणि तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांच्याकडे वैध विद्यार्थी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यां
काय म्हटलंय कंपनीने उपक्रमाबाबत
हेड ऑफ ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले आहे की, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अनोख्या गरजांबद्दल सतर्क आहोत. त्यानुसार आम्ही ‘स्टुडंट स्पेशल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. जो विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात अधिक सुविधा देतो. आम्ही विद्यार्थ्यांचा विमान प्रवास सुलभ आणि त्रासमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.
इंडिगो ही भारत देशामधील एक कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३ टक्के इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. रोज ५३४ उड्डाणांद्वारे ३६ विमानताळांवर या कंपनीची ए-३२० प्रकारची ८४ विमाने ये-जा करतात.