'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाहीत तोपर्यंत...', RSS चे प्रमुख मोहन भागवत यांचं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाबाबत विधान केलं आहे. यावेळी त्यांनी समाजाच्या एकतेवर भर दिला आहे. भारताची एकताच हिंदूंची सुरक्षा करू शकते. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी तळागाळापर्यंत जोडलेले आहेत. जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल तेव्हाच भारताला वैभव प्राप्त होईल, असं मत त्यांनी मांडलं आहे. आरएसएसच्या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. शेजारील देशांमध्ये हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांनी बाळगलेलं मौन यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ‘जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“ते तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात…; गिरीश महाजनांनी छगन भुजबळांवर लगावला जोरदार टोला
मोहन भागवत पुढे म्हणाले, ‘हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी अगदी तळागाळापर्यतं जोडलेले आहेत. त्यामुळे हिंदू समाजाला प्रतिष्ठा मिळाली तर भारतालाही गौरव प्राप्त होईल. जे कधी काळी हिंदू होते ते लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत. त्यांनाही एक मजबूत हिंदू समाजच सोबत घेऊन जाऊ शकतो. जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला तर स्वाभाविकपणे जगभरातील हिंदूंनाही बळ मिळेल. यावर काम सुरू आहे, पण अद्याप पूर्ण झालेलं नाही. हळूहळू पण निश्चितच हिंदू समाज एक होण्याची परिस्थिती विकसित होत आहे.
”बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध यावेळी जो संताप व्यक्त झाला आहे तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. आता तिथले हिंदू स्वतः म्हणत आहेत – ‘आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू. हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे आणि संघटनेच्या विस्तारामुळे ही ताकद आणखी व्यापक होणार आहे. हे ध्येय पूर्णपणे साध्य होईपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवावा लागेल.’
निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक
संघ जगभरातील हिंदूंसाठी शक्य ते सर्व काही करण्यासाठी तयार आहे. परंतु आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केलं जाईल. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.