फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट गुरुग्राम : फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट दक्षिण आशियातील पहिल्या गॅमा नाइफ एस्प्रिटच्या उद्घाटनाची साभिमान घोषणा करत आहे. Leksell Gamma Knife® चा हा नवी वाट निर्माण करणारा प्रकार ब्रेन ट्यूमर्ससाठीच्या शस्त्रक्रियेविना पार पाडल्या जाणाऱ्या अत्यंत अचूक उपचार पद्धतीचे एक नवे यंत्र घेऊन आले आहे. ज्यामुळे घातक आणि अघातक अशा दोन्ही प्रकारच्या ट्यूमर्ससाठीच्या आणि मेंदूमधील इतर अपसामान्यतावरील उपचारांसाठी अधिक चांगला पर्याय मिळाला आहे.
[read_also content=”सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम, इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाईल हातची नोकरी, पाहा नियम https://www.navarashtra.com/india/government-employee-takes-leave-for-5-consecutive-years-such-a-government-servant-is-relieved-from-employment-546798.html”]
गॅमा नाइफ कम्प्युटरच्या मार्गदर्शनानुसार ब्रेन ट्यूमरला प्रत्यक्ष न कापता अचूकपणे लक्ष्य करते. त्यामुळे मल्टिपल ब्रेन मेटास्टेसेस, मेनिन्जिओमाज, अकुस्टिक ट्यूमर्स आणि पिट्युटरी अडेनोमस यांच्यासह कर्करोगयुक्त घातक ट्यूमर्स आणि अघातक ट्यूमर्स दोहोंच्या उपचारांसाठी हा इष्टतम पर्याय ठरतो. या पद्धतीची अचूकता मेंदूच्या संवेदनशील किंवा पोहोचायला कठीण अशा भागांतल्या ट्यूमरचा वेध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आणि हे करताना मेंदूच्या निरोगी उती सुरक्षित राहतात आणि रुग्ण जवळ-जवळ तत्काळ आपल्या दैनंदिन कामांमध्ये परतू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे मल्टिपल ब्रेन मेटस्टेटिससाठी रेडिएशन थेरपीची जवळजवळ ३० सेशन्स लागतात. याउलट गॅमा नाइफ रेडिओ सर्जरीमध्ये संपूर्ण ट्रीटमेंट केवळ एका सेशनमध्ये केली जाते आणि त्याच दिवशी रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडले जाते, ज्यामुळे ही पद्धती चपळाईने आणि तत्परतेने पूर्ण होते. इतकेच नव्हे तर मल्टिपल मेसास्टेटिसमध्ये कर्करोग कितीही प्रमाणात पसरला असला तरीही त्यावरील उपचार एका सत्रातच पूर्ण होतो. इतर तंत्रज्ञानांमध्ये हा फायदा मिळत नाही. पद्धतीमध्ये निरोगी उती रेडिएशनच्या संपर्कात येण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे हालचालींशी संबंधित प्रेरक चेतापेशी तसेच संवेदी चेतापेशी शाबूत राहतात. ज्यामुळे रुग्णाची तब्येत वेगाने पूर्ववत होते आणि उपचारांनतरच्या जीवनमानाच्या दर्जातही सुधारणा होते. म्हणूनच गॅमा नाइफ रेडिओसर्जरीला जगभरात मेंदूच्या रेडिओसर्जरींसाठीचे सुवर्ण मानक मानले जात आहे. रुग्णाला त्यांच्या व्यक्तिगत गरजेनुसार देखभाल मिळावी आणि उपचारांचा आरामदायी अनुभव मिळावा यासाठी ही प्रक्रिया एकतर फ्रेम-आधारित किंवा फ्रेमलेस पद्धतीने पार पाडली जाते आणि प्रक्रिया अचूकतेने पार पडली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रक्रिया पार पडल्यानंतर स्टीरिओटॅक्टिकएमआरआय केले जाते.
फोर्टिस हेल्थकेअरने गॅमा नाइफ टेक्नोलॉजी ही काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली, भरपूर चाचण्यांमधून मान्यता प्राप्त केलेली आणि भारतातील त्याचबरोबर जगभरातील क्लिनिशियन्स आणि रुग्णांच्या मोठ्या विश्वासास पात्र ठरलेली पद्धत आणली आहे. ही एकात्मिक आणि कार्यतत्पर यंत्रणा ०.३ मिमी इतक्या अचूकतेची हमी देते आणि मेंदूच्या निरोगी पेशींपर्यंत ही पोहोचण्याची मात्रा इतर तंत्रज्ञानांच्या तुलनेत २-४ पट कमी असते तर कवटीच्या बाहेरील भागात तर याची मात्र २-२१ पट कमी प्रमाणात पोहोचते. गॅमा नाइफमधील ही सर्वोत्तम अचूकता आणि नेमकेपणा यामुळे त्यातील विषक्तता अर्थात टॉक्सिसिटी कमी होते आणि मेंदूच्या चांगल्या भागावर त्याचे दुष्परिणामही कमी होतात. गॅमा नाइफ पद्धती ब्रेन ट्यूमर्स आणि मेंदूच्या इतर आजारांवर किमान दुष्परिणामांसह नियंत्रण आणण्यातील यशस्वीतेची हमी देते. गॅमा नाइफ रेडिओसर्जरीची पूर्वकामगिरी उल्लेखनीय आहे. या पद्धतीने १० वर्षांच्या कालावधीमध्ये मेंदूच्या आजारांवर मिळविलेल्या नियंत्रणाचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे, ज्यामुळे या समस्यांपासून दीर्घकालीन आरामाची शाश्वती मिळत आहे.
फोर्टिस मेमोरियल, गुरगाव येथील न्यूरोसर्जरी विभागाचे डिरेक्टर डॉ. संदीप वैश्य म्हणाले की, “आमच्या केंद्रामध्ये सुरू झालेली दक्षिण आशियातील पहिली गॅमा नाइफ एस्प्रिट सुविधा हा न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रातील एक लक्षणीय टप्पा आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे यापूर्वी असाध्य असेलल्या न्यूरोसर्जिकल प्रक्रियांना नेमकेपणाची पातळी प्राप्त झाली आहे, जिथे ब्रेन ट्यूमर्सचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येतो. गॅमा नाइफ एस्प्रिटमुळे निरोगी उती रेडिएशनच्या संपर्कात येण्याची शक्यता खूप कमी होते. जे संभाव्य दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. या क्षमतेमुळे आम्हाला रुग्णाला अधिक चांगली सुरक्षा आणि आराम पुरविणे शक्य होते आणि त्यातून रुग्णाची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत होते. आजारातून बरे होण्याचा कालावधी खूपच कमी झाल्याने आम्हाला या चिकित्सापद्धतीचे अधिक चांगले परिणाम तर मिळतातच पण त्याचबरोबर रुग्णांच्या एकूण अनुभवातही मोठी सुधारणा होते. वैद्यकीय उपचार आणि रुग्णदेखभालीच्या क्षेत्रामध्ये कोणत्या शक्यतांच्या सीमारेषा विस्तारण्याच्या आमच्या चालू प्रयत्नांमध्ये उचललेले हे एक पुढचे पाऊल आहे.”
फोर्टिस हेल्थकेअरचे ग्रुप सीओओ अनिल विनायक यांनी कर्करोगाच्या सर्वांगीण देखभालीच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून फोर्टिसच्या व्यापक ध्येयाविषयी विस्ताराने सांगितले. ते म्हणाले की, “दक्षिण आशियामध्ये पहिले गॅमा नाइफ एस्प्रिट बसविणे हे न्यूरोसर्जरी आणि सर्वांगीण कर्करोग देखभालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश करण्याप्रती फोर्टिस हेल्थकेअरच्या कटिबद्धतेचे मूर्त रूप आहे. आमची बांधिलकी केवळ प्रगत उपचार पुरविण्यापुरतीच मर्यादित नाही तर रुग्णाची एकूण वाटचाल आणि त्याला मिळणारे परिणाम यात सुधारणा घडवून आणणारी सर्वांगीण देखभाल पुरविण्याचाही त्यात समावेश होतो. या भूभागामध्ये वैद्यकीय नवसंकल्पना आणि रुग्ण-केंद्री देखभाल पुरविण्याच्या बाबतीत आमचे आघाडीचे स्थान पुन:प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आणखी एक पाऊल आहे.”
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी भारतातील अॅम्बेसेडर ऑफ स्वीडन श्री. जॅन थेस्लेफ म्हणाले की, ”गुरगावमधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट (एफएमआरआय) येथे सर्वात प्रगत गॅमा नाइफ एस्प्रिटच्या लाँचप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासह मला एलेक्टा सारख्या स्वीडिश कंपन्या आणि भारतातील आघाडीची हेल्थकेअर चेन फोर्टिस हेल्थकेअर यांच्यामधील महत्त्वपूर्ण सहयोग पाहताना सन्माननीय वाटत आहे. दक्षिण आशियामध्ये अद्वितीय आणि अचूक रेडिओसर्जरी तंत्रज्ञानाच्या या उल्लेखनीय सादरीकरणामधून आमच्या सहयोगाचा परिवर्तनात्मक प्रभाव, तसेच आरोग्यसेवा सर्वोत्तमतेला प्रगत करण्याप्रती एफएमआरआयची समर्पितता दिसून येते. स्वीडिश कंपन्या हेल्थकेअर इनोव्हेशनमधील त्यांच्या नेतृत्वासाठी ओळखल्या जातात आणि यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सहयोगाने प्रगत वैद्यकीय उपचारांमधील तफावत दूर करत आहोत, ज्यामुळे येथील रूग्णांना अत्याधुनिक केअर सुविधा उपलब्ध असण्याची खात्री मिळेल. स्वीडन आणि भारत यांच्यामधील, विशेषत: फोर्टिस हेल्थकेअरसोबतच्या आमच्या सातत्यपूर्ण सहयोगामधून हेल्थकेअरमधील नाविन्यता आणि सर्वोत्तमतेप्रती आमची संयुक्त कटिबद्धता दिसून येते. मी आमचा सहयोग सतत यशस्वी राहण्याची आणि सर्वांसाठी शाश्वत हेल्थकेअर सोल्यूशन्स वितरित करण्याची अपेक्षा करतो.”
गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ न्यूरोसर्जरीमध्ये मेंदू, पाठीचा कणा आणि परिघीय पेशींना हानी पोहोचविणाऱ्या आजारांच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारासाठी सर्व प्रकारच्या उपचारपद्धती पुरविल्या जातात. या सेवांमध्ये इंट्राक्रेनियल ट्यूमर्स, स्कल बेस सर्जरी आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरीपासून ते ब्रेन अन्युरिझम आणि एव्हीएम्स (एंडोव्हॅस्क्युलर/सर्जरी), एपिलेप्सी सर्जरी, डोक्याला झालेली दुखापत, स्ट्रोक, एंडोस्कोपिक सर्जरी आणि हायड्रोसिफॅलस सर्जरी यांसारख्या मेंदूवरील शस्त्रक्रियांचे अनेक प्रकार समाविष्ट आहेत. त्याचबरोबर या विभागामध्ये पाठीच्या कण्यावरील विविध शस्त्रक्रियाही केल्या जातात, ज्यात सर्व्हिकल आणि लंबर डिस्क सर्जरी, डिजनरेटिव्ह स्पाइन सर्जरी, स्पाइन ट्यूमर्स आणि स्पायनल ट्यूबरक्युलॉसिसवरील शस्त्रक्रिया, पाठीच्या कण्याला झालेली दुखापत आणि फ्रॅक्चर्स यांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या प्रक्रिया इमेज गाईडन्स अर्थात प्रतिमांमधून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा वापर करून आणि इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंगचा अर्थात शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या इमेजिंगचा वापर करून केल्या जातात आणि अनेक शस्त्रक्रिया या कीहोल किंवा शरीराचा अत्यंत छोटा छेद घेऊन पार पाडल्या जातात. या विभागाकडे न्यूरोसर्जन्स, न्यूरो- अनॅस्थेटिस्ट, इन्टेन्सिव्ह केअर स्पेशलिस्ट्स आणि संबंधित तांत्रिक सहाय्य पुरविणाऱ्या कर्मचारीवर्गाचा समावेश असलेली अत्यंत सक्षम टीम आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्ज असा हा विभाग यशस्वी प्रक्रियांची हमी देतो आणि रुग्णाला कमीत-कमी त्रासामध्ये वेगाने बरे होण्यास मदत करतो. या विभागामध्ये गॅमा नाइफ तंत्रज्ञानाची भर पडल्याने आयुष्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या आघाडीच्या नवसंकल्पनांप्रती फोर्टिसची बांधिलकी नव्याने सिद्ध झाली आहे.






