Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP ATS Arrests Terrorist: ISI च्या जाळ्यात अडकले मेरठ आणि दिल्लीचे तरुण; भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

तपासानुसार, तुषार हळूहळू कट्टर बनला आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आला. तो पाकिस्तानी हँडलर्सच्या नियमित संपर्कात होता आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी त्याने बनावट खातीदेखील तयार केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 24, 2026 | 05:04 PM
UP ATS, Terrorist Arrest, ISI Network, National Security, Breaking News,

UP ATS, Terrorist Arrest, ISI Network, National Security, Breaking News,

Follow Us
Follow Us:

UP ATS Arrests Terrorist:  उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS)ने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. नोएडा पाकिस्तानशी संबंधित नेटवर्क आणि ‘आयएसआय’साठी काम केल्याच्या आरोपावरून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. नोएडा येथे अटक केल्यानंतर, त्यांना लखनौ येथील एटीएस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांनी कोठडी सुनावली आहे. या संशयित दहशवाद्यांकडून एक .३२-बोर पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक चाकू आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

तपास यंत्रणांच्या मते, ते भारतात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करत होते, एटीएस’ने अटक केलेल्या आरोपींची तुषार चौहान उर्फ ​​हिजबुल्ला अली खान (रा. मेरठ) आणि समीर खान (रा. नवी दिल्ली) अशी नावे आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी आणि आबिद जाट यांच्या संपर्कात होते. ते आयएसआय एजंट असल्याचे भासवून भारतीय तरुणांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत होते.

West Bengal Election 2026: बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा ‘गड’ जिंकण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान; काय आहे राजकीय समीकरणे?

सोशल मीडियाद्वारे संपर्क

हे दोन्ही आरोपी एन्क्रिप्टेड चॅनेल आणि कॉन्फरन्स कॉलद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. समीरला भिंतींवर ‘तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’ लिहिण्याचे आणि नवीन लोकांची भरती करण्याचे काम सोपवण्यात आले होते. तुषार इंस्टाग्रामद्वारे समीरच्या संपर्कात आला आणि त्यानंतर त्या दोघांनी कथितरित्या लक्ष्यांची टेहळणी करण्यास सुरुवात केली.

तपासानुसार, तुषार हळूहळू कट्टर बनला आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आला. तो पाकिस्तानी हँडलर्सच्या नियमित संपर्कात होता आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी त्याने बनावट खातीदेखील तयार केली होती.

Raghav Chadha Breaking : ‘मी चुकीच्या पक्षातला योग्य माणूस…’ राघव चड्ढांसह ३ खासदारांचा ‘आप’चा राजीनामा

हल्ल्याचा कट आणि आमिष

अहवालानुसार, शहजाद भट्टीने तुषारला विशिष्ट घरांवर ग्रेनेड फेकण्याचे आणि हल्ले करण्याचे काम दिले होते. त्याला सुरुवातीला ५०,००० रुपये आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर अडीच लाख रुपये देण्याचे वचन देण्यात आले होते. त्याला पासपोर्ट आणि दुबईमार्गे पाकिस्तानला जाण्यासाठी वाहतुकीचे आश्वासनही देण्यात आले होते.

तपास यंत्रणा असेही सुचवतात की, कथित आयएसआय एजंट मेजर हमीद, मेजर इक्बाल आणि मेजर अन्वर हे त्या नेटवर्कचा भाग असू शकतात, ज्याने त्या दोघांना लक्ष्य आणि संसाधने पुरवली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, काही पैसे आणि शस्त्रे आरोपींपर्यंत पोहोचत होती. या कटात सामील असलेल्या इतर व्यक्तींना ओळखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सध्या संपूर्ण नेटवर्कचा सखोल तपास करत आहेत.

Web Title: Up ats arrests two suspected terrorists in noida for links with pakistans isi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 05:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.