Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाक्षागृह की कब्रस्तान? कोर्टानं 53 वर्षांनी फेटाळली मुस्लीम पक्षकारांची याचिका

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बदरुद्दीन शाह मजार (कबर) आणि लाक्षागृह वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2024 | 04:30 PM
लाक्षागृह की कब्रस्तान? कोर्टानं 53 वर्षांनी फेटाळली मुस्लीम पक्षकारांची याचिका
Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (UP) बागपत (Baghpat Case) येथील बदरुद्दीन शाह मजार (Badruddin Shah Mazar) (कबर) आणि लाक्षागृह (Lakshagriha) वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे. अयोध्येतील राम मंदिरानंतर (Ayodhya Ram Mandir) सध्या कृष्णजन्मभूमी मथुरा (Krishna Janmabhoomi Mathura) व ज्ञानवापी मशीदीच्या (Gyanvapi Masjid) बाबतीत देखील न्यायालयीन प्रक्रियेने वेग घेतला आहे. दरम्यान, बागपत येथील वादावर देखील कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील वादग्रस्त जागेवर मागील 50 वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. याबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी निर्णय दिला असून न्यायमूर्तींनी हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच बागपत येथील वादग्रस्त 100 बिघा (जवळपास पाच एकर) जमीन हिंदू पक्षकारांना दिली आहे. 1970 साली हा वाद समोर आला. मुकीन खान या मुस्लीम व्यक्तीने येथील लाक्षागृहास बदरुद्दीन शाह यांची कबर आणि कब्रस्तान (मुस्लीम समुदायाची स्मशानभूमी) म्हटलं होतं. मुस्लीम पक्षकारांनी या जागेवर दावा केला.

या दाव्यानंतर हिंदू  संघटनांनी याप्रकरणी याचिका दाखल केली. तब्बल 50 वर्षे चालू असलेल्या या खटल्यावेळी हिंदू पक्षकारांनी अनेक पुरावे सादर केले. महाभारत काळापासून या ठिकाणी लक्षागृह (लाखापंडप) अस्तित्वात आहे. या जागेचा पांडवांशी संबंध आहे. असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे होते. या जागेवर भारतीय पुरातत्व विभागाने 1952 साली उत्खनन केले. यावेळी तिथे 4,500 वर्षे जूनी भांडीदेखील सापडली होती. ही भांडी महाभारतकालीन असल्याचा दावा केला जातो.

पांडवकालीन बोगदा जेथून पांडव पळून गेले 

महाभारतातील कथेप्रमाणे दुर्योधनाने पांडवांविरुद्ध षडयंत्र रचून त्यांच्या निवाऱ्यासाठी वारणावत (बरनावा) येथे लाखेपासून एक महाल उभारला होता. यामध्ये त्यांना जाळून मारण्याचे नियोजन केले होते मात्र पांडव बोगद्यातून पळून गेले. संस्कृत शाळेतील प्राचार्य आचार्य अरविंद कुमार शास्त्री यांनी सांगितले की, बागपत ही छोटी टेकडी महाभारत काळातील लाक्षागृह आहे. येथे पांडवकालीन बोगदादेखील आहे. याच बोगद्याचा वापर करून पांडव लाक्षागृहातून पळून गेले होते.” तर मुस्लीम पक्षकारांकडून सांगण्यात येत आहे की, संबंधित जागेवर शेख बदरुद्दीन यांचा दर्गा आणि कब्रस्तान आहे. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे दर्गा आणि कब्रस्तानाची नोंद आहे.

Web Title: Up baghpat case lakshagrah vs badruddin shah mazar kabristan hindu winsin nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir

संबंधित बातम्या

अयोध्येचे श्रीराम ‘रामलल्ला’ कसे बनले? प्रभू श्रीरामांना ‘अज्ञान बालक’ बनवून कसा जिंकला रामजन्मभूमीचा खटला? जाणून घ्या
1

अयोध्येचे श्रीराम ‘रामलल्ला’ कसे बनले? प्रभू श्रीरामांना ‘अज्ञान बालक’ बनवून कसा जिंकला रामजन्मभूमीचा खटला? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.