Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime News 2026: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद POCSO अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

झुंसी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केवळ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह त्यांचे शिष्य मुकदानंद ब्रह्मचारी आणि इतर दोन-तीन अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 22, 2026 | 12:46 PM
Swami Avimukteshwaranand FIR, Prayagraj POCSO Case News,

Swami Avimukteshwaranand FIR, Prayagraj POCSO Case News,

Follow Us
Close
Follow Us:
  • शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य मुकुंदानंद गिरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
  • स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप
  • पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायदा (२०१२) मधील कलम ३, ४(२), ५, ६, १६ आणि १७ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३५१(३) नुसार गुन्हा
Swami Avimukteshwaranand FIR: प्रयागराज येथील ज्योतिष पीठाचे प्रमुख शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरूद्ध झुंसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ADJ (बलात्कार आणि POCSO) विशेष न्यायालयाच्या कडक आदेशानंतर, पोलिसांनी POCSO कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक गंभीर कलमांखाली कारवाई केली. २१ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने अर्जदाराचा अर्ज स्वीकारला आणि पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (Crime news)

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (पोक्सो) विनोद कुमार चौरसिया यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य मुकुंदानंद गिरी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण वादाच्या मुळाशी स्वामी रामभद्राचार्य यांचे शिष्य आणि शाकुंभरी पीठाधीशेश्वराचे प्रमुख आशुतोष ब्रह्मचारी यांनी दाखल केलेली तक्रार आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, माघ मेळ्यादरम्यान, एक अल्पवयीन आणि एक प्रौढ मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर बलात्काराचे अत्यंत गंभीर आरोप केले.

यापूर्वीदेखील झुंसी पोलिस ठाण्यात या पीडितांच्या वतीने तक्रार दाखल केली होती, परंतु बराच कालावधी उलटूनही पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यात उशिर केल्याचा आरोप आशुतोष ब्रह्मचारी यांचा आरोप आहे. दरम्यान २८ जानेवारी रोजी कलम १७३(४) अंतर्गत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल

शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांवर कायदेशीर दबाव

झुंसी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केवळ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह त्यांचे शिष्य मुकदानंद ब्रह्मचारी आणि इतर दोन-तीन अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर कलमे लावली आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी), २०२३ च्या कलम ३५१(३) व्यतिरिक्त, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पॉक्सो), २०१२ च्या कलम ३, ४(२), ५, ६, १६ आणि १७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषतः पॉक्सो कायद्याचे कलम ५ आणि ६ “गंभीर लिंगभेदक लैंगिक अत्याचाराशी” संबंधित आहेत, ज्यात कायद्यानुसार सर्वात कठोर शिक्षा आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या या हाय-प्रोफाइल प्रकरणाने केवळ प्रयागराजमध्येच नाही तर देशभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक जगातही खळबळ उडाली आहे. प्रयागराज पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यानंतर पुरावे गोळा केले जात आहेत. तपासदरम्यान, पीडितांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याचा तक्रारदारांनी दावा केला आहे. दरम्यानस पोलिसांकडून सध्या पिडीतांचे जबाब नोंदवण्यात येत आहे. या प्रकरणामुळे धार्मिक संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि शिस्तीबद्दल पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Up crime news 2026 shankaracharya swami avimukteswaranand booked for sexual abuse under pocso what exactly is the matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.