UP STF suspected of deliberately causing stampede at Prayagraj Kumbh Mela
प्रयागराज : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्साह आहे. कोट्यवधी भाविकांनी अमृतस्नान केले आहे. नागा साधूंसह देशातील अनेकांनी या महाकुंभमेळ्याला उपस्थिती लावली आहे. देशासह संपूर्ण जगामध्ये महाकुंभमेळ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र महाकुंभ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या रात्री चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक भाविकांनी आपले प्राण गमावले असून य़ामुळे उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र ही चेंगराचेंगरी देखील षडयंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
महाकुंभ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येला कोट्यवधी भाविकांची गर्दी जमली. यावेळी झालेली चेंगराचेंगरी ही एखाद्या कटाचा भाग होती का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यूपी एसटीएफने संगम नाक्याभोवती सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरच्या डेटाची तपासणी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 हजारांहून अधिक मोबाईल नंबरच्या डेटाचे विश्लेषण केले जात आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेपासून अनेक मोबाईल नंबर बंद असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. महाकुंभ मेळा परिसरात बांधलेल्या कमांड अँड कंट्रोल रूमच्या सीसीटीव्ही फुटेजवरून फेस रेकग्निशन अॅपद्वारे संशयितांची ओळख पटवली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२९ आणि ३० जानेवारी रोजी रात्री मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे २ वाजता प्रयागराज महाकुंभ मेळा परिसरात चेंगराचेंगरी झाली होती. घटनेच्या सुमारे १६ तासांनंतर, महाकुंभ प्रशासनाने चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर उत्तर प्रदेश माहिती विभागाच्या मते, रविवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ४१.९० लाखांहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले होते. अशाप्रकारे, आतापर्यंत ३४ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभातील संगमात स्नान केले आहे. 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानापूर्वी, बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रयागराज शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
आगीची घडली होती घटना
महाकुंभ मेळ्यामध्ये यापूर्वी अग्नितांडव झाले होते. 19 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये आगीची घटना घडली होती. महाकुंभमेळ्यात सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. आग कशी लागली, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले. या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले. जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले. ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. मात्र नंतर याची जबाबदारी खालिस्तानी संघटनेने घेतली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कुंभमेळ्यामध्ये लागलेली आगीच्या घटनेची खालिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले होते. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटण्यात आले होते. त्यानंतर महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. यामुळे आता याचा पूर्ण तपास केला जात आहे.