खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमधील काही नेते हे मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे नाराज आहेत तर महाविकास आघाडीमधील नेते दारुण पराभव झाल्यामुळे नाराज आहेत. महायुतीला एकतर्फी यश मिळून देखील त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरुन वादंग निर्माण झाला आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत य़ांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन देण्यात आलं होतं, असं एकनाथ शिंदे खासगीत सांगतात. हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे, त्यांना विचारा, निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं. काही मंत्रिपद आणि महत्वाची खाती दिली, पण एकनाथ शिंदेंचा चेहरा पाहिल्यावर तुम्हाला कळेल, ते अजून धक्क्यात आहेत. 50-55 जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का आणि दुसरा म्हणजे भाजपने शब्द पाळला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे कोलमडले आहेत. त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आपण पुन्हा मागं फिरायचं का?
खासदार राऊत यांनी शिंदे गटाबाबत अनेक दावे केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, ठत्यांची लोक समोर येऊन काहीपण सांगतील पण सरकारमध्ये मंत्रिपद असणं म्हणजे मानप्रतिष्ठा असते असं नाही. त्यांच्या (शिंदे गटाच्या) आमदारांमध्ये चलबिचल आहे. त्यांच्या पक्षाच्या एका गटावर फडणवीसांचे नियंत्रण आहे. किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण आहे. ते आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते, एकनाथ शिंदेंसाठी नाही. उरलेले लोक चलबिचल आहेत. आपल्याला नेतृत्व नाही, आपण पुन्हा मागं फिरायचं का? असा विचार सुरु आहे,ठ असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळालं?
केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र बजेटवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार राऊत म्हणाले की, कागदावरील बजेटवरुन लोकांना काय मिळणार हे बघण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळालं?, नरेंद्र मोदींचे प्रत्येक बजेट निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या असतात. भविष्यात बिहारच्या निवडणुका तिथे वर्षाव, जिथे भाजपचे सरकार नाही. त्या राज्यांच्या तोंडाला पान पुसतात, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बजेट समजलं नाही. आकडे आणि घोषणांवरुन जाऊन चालत नाही. ते जाणून घेण्यासाठी किमान 72 तास लागतात, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.