नवी दिल्ली : जगभरातील कोणत्या देशाचे सैन्य किती मजबूत आहे याविषयी 2024 ची लष्करी सामर्थ्य क्रमवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, अमेरिकन सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य ठरले, तर रशिया आणि चीनचे सैन्य दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. भूतानचे सैन्य शेवटच्या स्थानावर असून, पाकिस्तानी लष्कर नवव्या स्थानावर आहे. तर भारतीय लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य ठरले आहे. या यादीत दक्षिण कोरिया पाचव्या स्थानावर आहे.
145 देशांवर आधारित अहवाल
145 देशांवर आधारित हा अहवाल तयार करताना, सैन्यांची संख्या, लष्करी उपकरणे, आर्थिक स्थैर्य, भौगोलिक स्थान आणि उपलब्ध संसाधने अशा 60 हून अधिक घटकांचा विचार करण्यात आला आहे. हे घटक एकत्रितपणे पॉवर इंडेक्स स्कोअर निर्धारित करतात, जेथे कमी स्कोअर मजबूत लष्करी क्षमता दर्शवतात. ग्लोबल फायरपॉवरने ही यादी जाहीर केले.
गुंतागुंतीची प्रक्रिया
लष्करी शक्ती समजून घेणे गुंतागुंतीची बाब आहे. जरी ग्लोबल फायरपॉवर रँकिंग हे जागतिक लष्करी परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयुक्त प्रारंभिक बिंदू असले तरी त्यापलीकडे पाहणे महत्वाचे आहे.