Gautam Adani: "दोन्ही देशांचे संबंध..." अदानींवर लाचखोरीचा आरोप होताच व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण
भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर अमेरिकेतील एका कंपनीने फसवणूक आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कंत्राट मिळवण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. यावर आता या प्रकरणात व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण काय?
गौतम अदानी यांच्याविरोधात जे आरोप लावण्यात आले आहेत. त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप समजून घेण्यासाठी आपल्याला यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन अँड डीपार्टमेंट ऑफ जस्टीसकडे जावे लागेल. भारत आणि अमेरिका यांच्याबद्दल बोलायचे झालेच तर, दोन्ही देशांचे संबंध मजबूत आहेत. पुढे देखील हे संबंध असेच राहतील, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कराइन जीन-पियरे म्हणाले.
अमेरिकेतील वादामुळे अदानी समूह चांगलाच वादात सापडला आहे. भारतात देखील यावरून कॉँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेअर बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. हे लाच प्रकरणावर वाद निर्माण झाल्यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तर या प्रकारामुळे कंपनीने अमेरकेतील एक गुंतवणुकीचा मोठा करार देखील रद्द केला आहे.
अदानी समूहाचे स्पष्टीकरण काय?
अदानी ग्रीन संचालकानविरुद्ध अमेरिकेच्या कोर्टाने आणि अमेरिकन सिक्युरिटीज व एक्स्चेंज कमिशनने गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप निराधार असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. फिर्यादी पक्षाने आरोप लावले असले तरी देखील ते केवळ आरोप आहेत. जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोवर प्रतिवादी निर्दोष असतो, अशी स्पष्ट बाजू अदानी समूहाने निवेदन जारी मांडली आहे. या प्रकारे कायदेशीर लढाई लढण्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.
राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
राहुल गांधी गौतम अदानी यांच्याबाबत दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. गौतम अदानी प्रकरणावर आम्ही शांत बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेत देखील मांडणार आहोत. भाजपचे सरकार अदानी यांना वाचवेल हे आम्हाला माहिती आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्रित आहेत तोवर ते सुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानी यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करणार आहेत. गौतम अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जेलमध्ये जातील. भाजपचा निधी त्यांच्याशी जोडलेला आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.